शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

वाढती महागाई, पाणीप्रश्न सोडविणारा छत्रपती संभाजीनगरचा खासदार हवा; महिलांचे परखड मत

By बापू सोळुंके | Published: May 11, 2024 8:18 PM

शहराचा ज्वलंत पाणी प्रश्न सोडविणारा आणि तर महागाईवर आवाज उठविणारा खासदार आम्हाला हवा असल्याचे मत, महिलांनी व्यक्त केले.

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचा खासदार निवडण्यासाठी १३ मे रोजी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने सिडको एन ४ येथे आयोजित केलेल्या ''''चाय पे चर्चा'''' उपक्रमात सहभागी महिला नवा खासदार कसा हवा, यावर व्यक्त झाल्या. बहुतेक महिलांनी त्यांच्या मुलांना नोकरीच्या शोधात पुणे, मुंबईसह परप्रांतात जावे लागते. यामुळे येथील डीएमआयसीमध्ये नवीन उद्योग खेचून आणणारा खासदार हवा असल्याचे सांगितले. आयआयटी, आयआयएम, एम्स सारख्या राष्ट्रीय शैक्षणिक संस्था शहरात आणण्यासाठी प्रयत्न करणारा खासदार गरजेचा असल्याचे नमूद केले. शहराचा ज्वलंत पाणी प्रश्न सोडविणारा आणि तर महागाईवर आवाज उठविणारा खासदार आम्हाला हवा असल्याचे मत, व्यक्त केले. काय म्हणाल्या महिला?

राष्ट्रीय शैक्षणिक संस्था हव्याआजवरच्या खासदारांनी शहरासाठी केंद्रातील कोणती मोठी संस्था येथे आणली? आयआयटी, आयआयएम आणि एम्स सारख्या राष्ट्रीय शैक्षणिक संस्था येथे आणण्यासाठी भांडणारा खासदार आम्हाला हवा आहे. येथे चांगल्या शैक्षणिक संस्था नसल्याने येथील पालकांना त्यांच्या मुलांना दुसऱ्या शहरात पाठवावे लागते. बऱ्याचदा त्याचा खर्च त्यांना परवडत नाही.- डॉ. मनीषा मराठे. सामाजिक कार्यकर्त्या.

बेरोजगारी दिवसेंदिवस वाढतच आहेएमआयडीसीमध्ये मोठे उद्योग खेचून आणणाऱ्या खासदारांची गरज आम्हाला आहे. कारण येथे आयटी हब नाही. आयटी उद्योग येथे असते तर येथील इंजिनिअर्संना पुणे, मुंबई, बेंगळुरू सारख्या शहरात नोकरीसाठी जावे लागले नसते. डीएमआयसी असूनही तेथे एकही मोठा उद्योग आला नाही, याची खंत वाटते. परिणामी मतदारसंघातील बेरोजगारी दिवसेंदिवस वाढतच आहे. - दीपाली जाधव. ब्युटिशिअन. 

अंकुश ठेवणारा खासदार हवाशहर नुसतेच आकाराने मोठे झाले आहे. येथे आधी रस्ता तयार केला जातो, नंतर ड्रेनेजसाठी रस्ता खोदला जातो, याचा जनतेला मोठा त्रास होतो. अशाप्रकारे ढिसाळ कारभारावर अंकुश ठेवणारा खासदार हवा आहे.- सविता मराठे, गृहिणी.

पिण्याच्या पाण्याचा सोडवाशहराच्या पिण्याच्या पाण्याचा मागील २५ वर्षांपासून प्रश्न जैसे थे आहे. पाणी प्रश्न कायमस्वरुपी सोडविणारा खासदार हवा आहे. मराठा समाजाने लाखोंच्या संख्येने मूकमोर्चा काढला. मात्र केंद्राने समाजाची दखल घेतली नाही. मराठा आरक्षणावर संसदेत आवाज उठविणारा खासदार हवा आहे.- कल्पना साखळे, सामाजिक कार्यकर्त्या.

महागाईने सामान्य जनता त्रस्तशेती मालाला हमी भाव मिळत नाही, म्हणून मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या अधिक होत आहे. खते, बियाणे यावरील जीएसटी रद्द करून त्यांना दिलासा देणारा खासदार हवा आहे. वाढत्या महागाईने सामान्य जनता त्रस्त आहे. - दीपाली पिंगळे, गृहिणी.

महिलांचे आर्थिक गणितच बिघडले दहा वर्षांपूर्वी गॅस सिलिंडरचे दर ३०० रुपये होते. आज तीनपट दर वाढले आहे. यासोबतच प्रत्येक वस्तूवर जीएसटी द्यावा लागतो. यामुळे महिलांचे आर्थिक गणितच बिघडले आहे. वाढत्या महागाईवर आवाज उठविणारा तसेच शहरात रोजगार उपलब्ध करणारा खासदार आम्हाला हवा आहे.- स्वाती शिंदे, नोकरदार महिला

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील एकूण मतदारांची संख्या.- २० लाख ३५ हजार २३महिला मतदारांची संख्या- ९ लाख ८१ हजार ७७३ 

टॅग्स :aurangabad-pcऔरंगाबादlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४