शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटक आर्थिक संकटात! जेवढी द्यायची ऐपत, तेवढीच आश्वासने द्या...; खर्गेंनी महाराष्ट्रावरून नेत्यांचे कान टोचले
2
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या अध्यक्षांचे निधन; मोदींकडून शोक व्यक्त
3
IND vs NZ : भारताची आपल्या घरात 'कसोटी' तरी बुमराहला का विश्रांती? BCCI ने सांगितलं महत्त्वाचं कारण
4
ई-स्कूटर घ्या; पण तक्रारींचे काय? कंपन्यांविराेधात १२ हजार तक्रारी, केंद्र सरकार करणार चाैकशी
5
गुरु-शुक्राचा राजयोग: ९ राशींना सुखकर, दिवाळीनंतरही लाभ; उत्पन्न वाढ, नवीन नोकरीची संधी!
6
शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीत मोठी गर्दी; गोविंदबागेत उभे रहायलाही जागा नाही...
7
आधी बारावी, मग नववी; अस्लम शेख यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप, विनोद शेलार कोर्टात जाणार  
8
भेटायला आले, नमस्कार केला अन् गोळ्या झाडल्या; दिवाळी साजरी करणाऱ्या काका-पुतण्याची हत्या
9
मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचेच कार्यालय फोडले; अकोल्यात मोठा राडा, नेमके काय घडले...
10
अर्जुन कपूरने ब्रेकअप झाल्याचं सांगताच मलायकाची पोस्ट, म्हणते - "एका क्षणासाठी..."
11
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
12
HDFC Bankची उपकंपनी HDB फायनान्शिअल सर्व्हिसेस आणणार IPO; 'इतके' हजार कोटी उभे करणार
13
'सिंघम अगेन'च्या शेवटी मिळालं खास सरप्राइज! सलमान खानच्या एन्ट्रीने झाली नव्या सिनेमाची घोषणा
14
भारतात 2050 पर्यंत मुस्लीम लोकसंख्येत मोठी वाढ होणार, 'या' 3 देशांत हिंदू जवळपास 'संपुष्टात' येणार!
15
'विराट' विक्रम मोडला! इथं पाहा IPL च्या इतिहासातील Expensive Retained Players ची यादी
16
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
17
प्रियांका गांधींनी गुंतवलेल्या Mutual Fund नं किती दिले रिटर्न? तुमच्यासाठी फायद्याचा सौदा आहे की नाही?
18
सदा सरवणकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, माहिमच्या जागेवर चर्चा, मोठा निर्णय होणार?
19
IND vs NZ 3rd Test : न्यूझीलंडनं टॉस जिंकला, मॅच कोण जिंकणार?
20
गॅस सिलिंडर, UPI पेमेंट ते तिकीट बुकिंग; आजपासून बदलले 'हे' नियम बदलले, थेट खिशावर होणार परिणाम

छत्रपती संभाजीनगर ते पुणे या महामार्गास लवकरच मंजुरी मिळेल; नितीन गडकरींची माहिती

By विकास राऊत | Published: October 14, 2023 7:18 PM

लोकमत इफेक्ट: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सीएमआयएच्या शिष्टमंडळाला दिली माहिती

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर व्हाया पैठण ते पुणे या नवीन (एक्स्प्रेस-वे) द्रुतगती महामार्गाचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीसमोर येणार असून, त्यास मंजुरी मिळेल, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी उद्योजकांच्या शिष्टमंडळाला शुक्रवारी येथे दिली.

छत्रपती संभाजीनगर ते पुणे या महामार्गाबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर शुक्रवारी चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रिज ॲण्ड ॲग्रीकल्चरच्या (सीएमआयए) शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री गडकरी यांची विमानतळावर भेट घेऊन लोकमतमध्ये प्रकाशित झालेल्या बातम्यांच्या कात्रणासह निवेदन दिले. भेटीअंती त्यांनी शिष्टमंडळाला या महामार्गाचा डीपीआर तयार झाल्याचे सांगितले. तसेच ऑगस्टमध्ये भारतमाला टप्पा-२ मध्ये ग्रीनफिल्डमध्ये हा महामार्ग प्रस्तावित आहे. कॅबिनेटपूर्वीदेखील या महामार्गाचा निर्णय होऊ शकतो, असेही त्यांनी सीएमआयएला सांगितले. डीपीआरला मान्यता मिळताच पुढील काम वेगाने होईल. यावेळी भाजपा शहराध्यक्ष शिरीष बोराळकर, सीएमआयएचे अध्यक्ष दुष्यंत पाटील, सचिव उत्सव माछर यांच्यासह एनएचएआयच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

अधिसूचना निघून दहा महिनेया महामार्गाच्या भूसंपादनासाठी अधिसूचना ३ (ए) निघून १० महिने झाले आहेत. छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील पीरवाडी, हिरापूर, सुंदरवाडी, झाल्टा, आडगाव बुद्रुक, चिंचोली, घारदोन, तर पैठण तालुक्यातील पैठण (बायपास) वरवंडी खुर्द, पारगाव, डोणगाव, बालानगर, कापूसवाडी, वडाळा, बवा, वरुडी बुद्रुक, पाचळगाव, नारायणगाव, करंजखेडा, आखतवाडा, वाघाडी, दडेगाव जहाँगीर, पोटगाव, सायगाव, पैठण परिसरातून हा मार्ग जाणार आहे.

निवेदनात काय म्हटले आहे?शेंद्रा ते चिकलठाणा मार्गे वाळूजपर्यंत डबल डेकर उड्डाणपूल व मेट्रोचा प्रस्ताव प्रलंबित आहे. ऑरिक शेंद्रा ते बिडकीन हायवेचा प्रस्ताव मागे पडला आहे. जालना रोडविना या उद्योगांसह इतर वाहतुकीला पर्याय नाही. छत्रपती संभाजीननगर ते पुणे ग्रीनफिल्ड एक्सप्रेस - वे प्रकल्पाची घोषणा झाली. मात्र, पुढे काही झालेले नाही. औट्रम घाटाचे काम प्रलंबित आहे.

काय म्हणाले होते गडकरी?१० ते १२ हजार कोटींचा हा महामार्ग असून, पुढच्या दाैऱ्यात या मार्गाचे भूमिपूजन करण्यासाठी मी येईन. छत्रपती संभाजीनगर ते पुणे हे २२५ कि. मी. अंतर दोन तासांत पूर्ण करता येईल. त्यासाठी बीड ते अहमदनगर ते पैठणमार्गे अलायमेंट अंतिम झाले आहे.-केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (२४ एप्रिल २०२२, बीड बायपास येथील सभेत)

टॅग्स :AurangabadऔरंगाबादNitin Gadkariनितीन गडकरी