छत्रपती संभाजीनगर : हवाई सफर करणाऱ्यांमध्ये वाढ होत असून, विमानाने प्रवास करण्यात छत्रपती संभाजीनगरकर राज्यात चौथ्या स्थानी आहेत. ऑक्टोबरमधील आकडेवारीवरून ही बाब दिसते. राज्यात सर्वाधिक विमान प्रवासी मुंबई विमानतळाचे आहेत. त्यापाठोपाठ पुणे दुसऱ्या आणि नागपूर तिसऱ्या स्थानी आहे. कार्गो वाहतुकीतही मुंबईच ‘नंबर वन’ आहे. राज्यातील १३ विमानतळांमध्ये शिर्डी विमानतळ पाचव्या स्थानी आहे.
चिकलठाणा विमानतळाची स्थितीरोज लँडिंग - १०रोज टेक ऑफ - १०रोज येणारे प्रवासी - १,१८१रोज जाणारे प्रवासी - १,०१०इंडिगोची उड्डाणे - ९एअर इंडिया - १
विमानसेवा - मुंबई, दिल्ली, हैदराबाद, गोवा, नागपूर, अहमदाबाद, बंगळुरू (१९ नोव्हेंबरची आकडेवारी)
राज्यातील विमानतळावरून ऑक्टोबरमध्ये किती विमानांचे उड्डाण, किती प्रवासी ?विमानतळ - आंतरराष्ट्रीय उड्डाण - देशांतर्गंत उड्डाण - आंतरराष्ट्रीय प्रवासी - देशांतर्गंत प्रवासी - एकूण प्रवासीमुंबई - ७,६३४----२०,२०४----१२,५३,८०५----३१,६९,७८४----४४,२३,५८९पुणे - १०५----५,६९८----१४,२३८----८,४४,९९१----८,५९,२२९नागपूर - ६५----१,९४१----६,६१३----२,३१,८५८----२,३८,४७१छत्रपती संभाजीनगर - ०----६७५----०----६२,९२२-----६२,९९२शिर्डी - ०-----६१६----०----५६,८२६----५६,८२६नाशिक - ४२----४२२----४८----३३,८९९-----३३,९४७कोल्हापूर - ०----२८७----०----१२,५७९----१२,५७९जुहू - ०----२,१११---०----११,१५१----११,१५१नांदेड - ०----२७३-----०----१०,८९३----१०,८९३जळगाव - ०----२२२----०----८,५९१-----८,५९१गोंदिया - ०----७०----०----१,९७०-----१,९७०सिंधुदुर्ग - ०----७२----०----१,५९०----१,५९०सोलापूर-०----०----०---- ०----०
विमानाने ऑक्टोबरमध्ये कुठून किती मालवाहतूक ? (मेट्रिक टन)विमानतळ - आंतरराष्ट्रीय कार्गो - देशांतर्गत कार्गोमुंबई - ५७,६८९.७ मे. टन - २१,०३९.१ मे. टनपुणे - १९.६ मे. टन - ४१,४१.७ मे. टननागपूर - २.४ मे. टन - ८५३.६ मे. टनछत्रपती संभाजीनगर - ०---१२४.२ मे. टनशिर्डी - ०---५.७ मे. टननाशिक - ३६९.७ मे. टन--४०.६ मे. टन
पहिल्यांदाच एवढी जास्त प्रवासी वाहतूकचिकलठाणा विमानतळावरून प्रवाशांची संख्या वाढत आहे. ऑक्टोबरमध्ये ६२,९२२ प्रवासी वाहतूक नोंदवली गेली. ६७५ विमान उड्डाणे व १२४.२ मेट्रिक टन कार्गो वाहतूक झाली. विमानतळाच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढी जास्त प्रवासी वाहतूक नोंदवली गेली. ६० हजार प्रवासी वाहतुकीचा टप्पा या आधी डिसेंबर २०१९ मध्ये होता. नोव्हेंबर २०२४ चे आकडेसुद्धा वाढीवच असतील. नाशिक येथे आंतरराष्ट्रीय विमानाने कार्गो वाहतूक अधिक आहे.- अक्षय चाबूकस्वार, एअर कनेक्टिव्हिटी एव्हिएशन ग्रुप
विमानसेवा वाढीसाठी प्रयत्नशीलगोवा, नागपूरसाठी विमानसेवा सुरू झाली. त्यामुळे प्रवासी संख्येत वाढ झाली. विमानतळावरून नव्या विमानसेवा सुरू होण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आगामी काही दिवसांत नव्या विमानसेवा सुरू होण्याची अपेक्षा आहे.- शरद येवले, संचालक, चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळ