शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
2
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
9
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
10
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
11
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
12
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
13
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
14
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
15
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
16
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
17
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
18
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
19
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
20
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये

अपघातामुळे टँकरचे एक नोझल तुटले; १७.५ मेट्रिक टन गॅसचा १ किमी परिसराला होता धोका

By विकास राऊत | Published: February 02, 2024 5:05 PM

Chhatrapatisambhajinagar Gas Leak: भूतो न भविष्यती असे संकट शहरातील सुमारे एक किमी परिसरातील नागरी वसाहतींवर ओढवले असते.

छत्रपती संभाजीनगर: गॅस टँकर उड्डाणपुलाच्या दुभाजकाला धडकून झालेल्या झालेल्या अपघात गॅस टँकचे तीन नोझलपैकी एक पूर्णत:, तर दुसरे अर्धे तुटले. टँकर अपघातानंतर अर्धा फूट पुढे घासत गेले असते तर तिन्ही नोझल तुटून सुमारे १७.५ मेट्रिक टन एलपीजीचा स्फोट झाला असता. भूतो न भविष्यती असे संकट शहरातील सुमारे एक किमी परिसरातील नागरी वसाहतींवर ओढवले असते.

१२०० घरगुती गॅस सिलिंडर भरतात एका टँकरमध्ये---- १७.५ मेट्रिक टन एलपीजीचा टँक होता. १ टनामध्ये सुमारे ४० व्यावसायिक, तर ७० घरगुती गॅस सिलिंडर रिफील होतात. १२०० गॅस सिलिंडर पूर्ण टँकमध्ये रिफील केले जातात. यावरून गॅस गळतीचे संकट किती मोठे होते हे लक्षात येते. जर टँकरचा स्फोट झाला असता तर १ फेब्रुवारीचा दिवस छत्रपती संभाजीनगरकरांच्या कायम लक्षात राहिला असता.

मनपा प्रशासक पहाटेच अलर्ट...मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांना पहाटे ५ वाजून १८ मिनिटांनी घटनेची माहिती मिळताच ते तातडीने घटनास्थळी पाेहोचले. सायंकाळी ७ वाजेपर्यंत ते घटनास्थळीच होते. त्या परिसरात काही ज्वलनशील पदार्थ, वस्तूंपासून होणारा धोका लक्षात घेऊन प्रशासनाने ५०० मीटर अंतरातील शाळा, कॉलेज, बँक, दुकाने बंद करण्याचे आवाहन करत जवळील हॉटेल्स त्वरित रिकाम्या करण्याच्या सूचना दिल्या. मनपा नागरी मित्र पथकाचे प्रमुख प्रमोद जाधव, वाॅर्ड कार्यालय ०३, ०५ व ०७ यांचे स्वच्छता निरीक्षक यांनी परिसरातील हॉटेल्स रिकामे केले. महावितरणने विद्युत पुरवठा खंडित केला.

मनपाचे जवळपास ७० पाण्याचे टँकर....आपत्ती व्यवस्थापन कक्ष प्रमुख स्वप्नील सरदार, मुख्य अग्निशमन अधिकारी शिवाजी झनझन, अग्निशमन दलाच्या जवानांनी मदतकार्य सुरू केले. मनपा पाणीपुरवठा विभागाने जवळपास ७० टँकर ६ अग्निशमन बंब घटनास्थळी होते.

पब्लिक एड्रेस सिस्टीमने दिली माहिती...---स्मार्ट सिटी कंट्रोल रूममधून ४०० ठिकाणी बसविलेल्या पब्लिक एड्रेस सिस्टीम (स्पीकर)द्वारे नागरिकांना या घटनेची माहिती देण्यात आली. जल बेल ॲपवरदेखील माहिती दिली. अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील, सौरभ जोशी, सहायक आयुक्त नईम अन्सारी, सविता सोनवणे, प्रसाद देशपांडे, अग्निशमन विभागाचे सुरे व संबंधित अधिकारी, कर्मचारी मदतकार्यात होते.

जळगाव, पुण्यातून पथक

----जळगाव येथून रेस्क्यू टीम दाखल झाली. तसेच एनडीआरएफचे पथक, एलपीजी गॅस कंपनीचे पथक घटनास्थळी दाखल झाले. दुसऱ्या टँकरमध्ये अपघातग्रस्त टँकरमधील गॅस भरण्यास दुपारनंतर सुरुवात झाली.

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAccidentअपघात