शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
2
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
3
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
4
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
5
३८ टक्क्यांनी घसरला शेअर, आता रेटिंग वाढलं; गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
6
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
7
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
8
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
9
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
10
नवीन घर घेण्यासाठी तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकता का? जाणून घ्या सविस्तर...
11
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
12
शेअर बाजाराचे काही खरे नाही; गड्या, आपली बँकच बरी!
13
तडीपार झालेलेही मतदान करणार; पोलिसांकडून चार तासांची परवानगी
14
'सत्ते'पुढे शहाणपण नाही! सरकार वाचवण्यासाठी PM नेतन्याहू मान्य करणार हमासच्या अटी?
15
भाजपची मोठी कारवाई; माजी नगरसेवकांसह १६ जणांची भाजपकडून हकालपट्टी
16
मतदान केंद्रावरील मोबाइलबंदी योग्यच; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
17
मुंबईत ७६ मतदान केंद्रे ‘क्रिटिकल’; १३ केंद्र शहरातील, तर ६३ उपनगरातील!
18
लेकीला डॉक्टरांनी मृत घोषित केलं पण स्वामींनी तारलं! सविता मालपेकर यांनी सांगितला अंगावर शहारा आणणारा प्रसंग
19
बापरे! PICU वॉर्डमध्ये ऑक्सिजन पुरवठा केला जात असलेला पाईप चोरट्यांनी कापला अन्...
20
ज्या नगरसेवकाच्या वॉर्डात कमी मते, त्याचे तिकीट कापू; एकनाथ शिंदे यांचा इशारा

छावणी जळीत घटना; योग्य कलमांची वाढ, आराेपीला अटकही होणार

By सुमित डोळे | Published: April 06, 2024 7:56 PM

पोलिस उपायुक्त नितीन बगाटे यांचे स्पष्टीकरण, घटनेच्या नेमक्या कारणांचा तज्ज्ञांकडून अहवालही मागवणार

छत्रपती संभाजीनगर : छावणीच्या दाना बाजारमध्ये बुधवारी पहाटे ३:३० वाजता कपड्याच्या दुकानाला लागलेल्या आगीत सात जणांचे संपूर्ण कुटुंब आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. यात घरमालक शेख अस्लम शेख युनूस याच्यावर सात जणांच्या मृत्यूस जबाबदार असल्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, चौकशीसाठी ताब्यातही घेतले गेले नाही. मात्र, घडलेली घटना अत्यंत गंभीर आहे. यात आवश्यक कलमांची वाढ करून आरोपी शेख असलमला अटकदेखील होईल, असे पोलिस उपायुक्त नितीन बगाटे यांनी स्पष्ट केले.

शेख असलम शेख युनूस (५५) याच्या चार मजली घराच्या तळमजल्यावरील दुकानाला आग लागून बुधवारी शहराला हादरून टाकणारी घटना घडली. दुसऱ्या मजल्यावर भाड्याने राहणाऱ्या हमिदा बेगम अब्दुल अजीज (५५), त्यांची दोन मुले वसीम शेख (३५), सोहेल (३२), वसीम यांची पत्नी तनवीर (२७), सोहेल यांची पत्नी रेश्मा (२२) व अब्दुल यांची मुले असीम (४) व महानूर ऊर्फ परी (२) यांचा यात मृत्यू झाला. यात असलमच्या अनेक चुकांमुळेच ही आग लागल्याचा निष्कर्ष अग्निशमन विभाग, महावितरणच्या अधिकाऱ्यांनी पाहणीनंतर काढला होता. मात्र, छावणी पोलिसांनी कलमांमध्ये कुचराई करत केवळ भादंवी ३०४ अ नुसार गुन्हा दाखल केला. उपायुक्त बगाटे यांनी मात्र कलमांमध्ये वाढ करण्याचे आदेश दिल्यानंतर भादंवी ३०४ चे कलम वाढवण्यात आले. महावितरणच्या अहवालानंतर भारतीय विद्युत कायदा १३५ चेही कलम लावण्यात आले.

असलमवर नेमके आरोप काय ?महावितरणने व्यावसायिक मीटरची जोडणी तोडल्यानंतरही त्याने संपूर्ण दुकान, पाच मशीनचा वापर घरगुती मीटरवर केला. शिवाय, तीनही कुटुंबांतील विजेचा वापर त्याच मीटरवर सुरू होता. महावितरण अधिकाऱ्यांच्या मते, वायर देखील अत्यंत खराब दर्जाची होती.-अरुंद जिना बांधला. स्वत:च्या मजल्याला गॅलरी ठेवली. मात्र, दुसऱ्या मजल्यावरील घराला गॅलरी, खिडकी, मोकळी जागाच ठेवली नाही.-या सर्व बाबी धोकेदायक असू शकतात, याची जाणीव असलमला असूनही त्याने त्या चुका केल्या.

काय फरकभादंवी ३०४ (अ) नुसार हयगयीने मृत्यूस कारण होणे. यात सदोष मनुष्यवध या सदरात न मोडणारी कोणतीही हयगयीची कृती करून व्यक्तीच्या मृत्यूस कारण होईल.भादंवी ३०४ - मृत्यू घडवून आणण्याच्या किंवा ज्या कृत्यामुळे मृत्यू घडून येण्याचा संभव आहे, अशी जाणीव असूनही ते कृत्य करणे. यात दहा वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षेची तरतूद आहे. बगाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर घटना गंभीर आहे. असलम ला अटक केली जाईल. शिवाय, तज्ञांकडून देखील आम्ही या घटनेच्या नेमक्या कारणांचा स्वतंत्र अहवाल घेणार आहोत. ज्यातून आरोपीला शिक्षा होण्यास मदत मिळेल, असेही बगाटे यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारीfireआग