छत्रपती संभाजीनगर: विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते आ. अंबादास दानवे यांच्या मुलाच्या विवाह समारंभानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे, राज्याचे मंत्री अनिल पाटील, चंद्रकांत पाटील, दीपक केसरकर , अब्दुल सत्तार यांच्यासह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह अनेक आमदार, खासदार आणि व्हीआयपीं शुक्रवारी सायंकाळी छत्रपती संभाजीनगरमध्ये येत आहे.
विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते आ. अंबादास दानवे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे असले तरी त्यांचे सर्व पक्षातील नेत्यांसोबत मधुर संबंध आहे. सन २०२२ मध्ये शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नवीन शिवसेना अस्तित्वात आली. शिवाय शिंदे यांच्याच पक्षाला धनुष्यबाण चिन्ह मिळाल्याने शिवसेना पक्षाच्या दोन्ही गटामध्ये वैरभाव निर्माण झाले होते.
आज रोजी दानवे यांनी मुलगा धर्मराज यांच्या विवाह सोहळयास मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कुटुंबाला निमंत्रित केले होते. दानवे हे विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते असल्याने त्यांच्या निमंत्रणाचा स्विकार करून राज्यातील आणि केंद्र सरकारमील अनेक मंत्री या समारंभास उपस्थित राहात आहेत. दानवे यांना लोकसभेची उमेदवारी देण्यावरून पक्षाकडून चाचपणी सुरू असल्याच्या चर्चेवर हा विवाह समारंभ होत आहे.