जालना : येथून जवळच असलेल्या सिरसवाडी परिसरात मुंबई येथील आयसीटी अर्थात रसायन तंत्रज्ञान संस्थेची महाराष्ट्रातील पहिल्या विस्तारित शाखेचे भूमिपूजन आज सकाळी ११.३० च्या दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.
ही संस्था जालन्यात यावी म्हणून सत्तेतील सर्वच लोकप्रतिनिधींनी तसेच आयसीटीच्या जालना, औरंगाबोदतील माजी विद्यार्थी, उद्योजकांनी विशेष प्रयत्न केले. मोठ्या पाठपुराव्या नंतर ही अत्यंत प्रतिष्ठेची संस्था जालन्यात सुरु होणार आहे. याचा लाभ संपूर्ण मराठवाड्यातील युवकांना होणार आहे. सध्या या संस्थेसाठी ३९७ कोटी रूपयांची तरतूद केली असून ही संस्था २०३ एकर परिसरात उभी राहणार आहे.
यावेळी कार्यक्रमाच्या भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, पालकमंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, खा. संजय जाधव, आ. संतोष दानवे, आ. नारायण कुचे, आ. विक्रम काळे, आ. सुभाष झांबड, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, जि. प. अध्यक्ष अनिरूद्ध खोतकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदरगे, माजी आ. अरविंद चव्हाण, माजी आ. विलासराव खरात, भाजपचे उपाध्यक्ष भास्कर दानवे, रसायन तंत्रज्ञान संस्थेचे कुलगुरू डॉ. जी. डी. यादव, मनोज पांगारकर, आशिष मंत्री आदींची उपस्थिती होती.