औरंगाबाद : मराठवाड्यातील पहिली शिवसेना शाखा औरंगाबादेत ८ जून १९८५ रोजी स्थापन झाली. या शाखेच्या ३६ व्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवारी (दि. ८ जून) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांशी ऑनलाईन संवाद साधणार आहेत. वर्धापन दिननिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन केल्याची माहिती शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी कळविली आहे.
सकाळी ९ वा. गुलमंडीत ध्वजारोहण होईल. तसेच सॅनिटायझर, मास्क आणि आरोग्य साहित्य वाटप करण्यात येईल. सायं. ४ वाजता सत्यनारायण महापूजा होईल. सायं. ७ वाजता भावभक्तिगीतांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. बुधवारपासून ग्रामीण भागात पंचायत समिती गण व जि.प. गट तर शहरात वॉर्डनिहाय शिवजनसंपर्क मोहीम राबविण्यात येईल.
या कार्यक्रमास रोहयोमंत्री संदिपान भुमरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, आ. मनीषा कायंदे, सहसंपर्क प्रमुख त्र्यंबक तुपे, आ.अंबादास दानवे, जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, आ. प्रदीप जैस्वाल, आ. संजय शिरसाट, आ. रमेश बोरणारे, आ. उदयसिंग राजपूत, आर. एम. वाणी, किशनचंद तनवाणी, नंदकुमार घोडेले, राजेंद्र जंजाळ, ऋषिकेश खैरे यांच्यासह सर्व आजी-माजी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित राहणार आहेत. यावेळी कोरोनाच्या नियमाचे पालन केले जाईल, असे सांगण्यात आले.