आदित्यनाथ आज मुंबईत
-------------------
लखनौ म्युनिसिपल बाँडस्ची बीएसईमध्ये लिस्टिंग
लखनौ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बुधवारी (दोन डिसेंबर)
येथे बाँबे स्टॉक एक्स्चेंजमध्ये होणाऱ्या लखनौ म्युनिसिपल बाँडस्च्या लिस्टिंग समारंभात सहभागी होण्यासाठी येत आहेत. लखनौ नगर निगम २०० कोटी रुपयांच्या बाँडस्ची ही लिस्टिंग होत आहे.
उत्तर भारतात कोणत्याही नगरपालिकेने बाँडस् जारी करणारे उत्तर प्रदेश हे पहिले राज्य ठरले आहे. बाँडस् सूचीबद्ध झाल्यानंतर जनतेला मूलभूत सुविधा देण्यासाठी निधी उपलब्ध होणार आहे, तसेच ट्रेंडिंगसाठी ग्राहकांनाही बाँडस् उपलब्ध होतील.
या बाँडस्ला गुंतवणूकदारांकडून साडेचार पट अधिक सबस्क्राईब केले गेले आहे. या बाँडस्मध्ये गुंतवणूकदारांना असलेल्या रुचीच्या कारणामुळे दहा वर्षांसाठी ८.५ टक्क्यांचा अत्यंत आकर्षक कूपन दर प्राप्त झाला आहे. हा आतापर्यंत जारी झालेल्या म्युनिसिपल बाँडमध्ये द्वितीय किमान स्तर आहे.
योगी आदित्यनाथ हे या भेटीत उत्तर प्रदेशमध्ये गुंतवणूक व्हावी यासाठी प्रतिष्ठित उद्योगपती आणि औद्योगिक संस्थांच्या प्रतिनिधींशी चर्चा करतील, तसेच डिफेन्स कॉरिडॉर आणि फिल्म सिटीतील गुंतवणूकदारांशीही चर्चा करतील. आदित्यनाथ यांनी राज्यात गुंतवणूक व्हावी यासाठी अनुकूल वातावरण तयार केले, त्यामुळे राज्य आकर्षक गुंतवणूक ठिकाण बनले आहे. उत्तर प्रदेश उद्योगपती, व्यावसायिक आणि गुंतवणूकदारांना अनेक प्रकारच्या सवलती देत आहे. राज्य सरकार डिफेन्स इंडस्ट्रियल कॉरिडॉरच्या विकासासाठी कटिबद्ध आहे व विकासाला प्राधान्य दिले गेले आहे.
राज्यात चित्रपट उद्योगाला प्रोत्साहन मिळावे यासाठी ‘फिल्म नीती-२०१८’ लागू केली आहे. जेवर आंतरराष्ट्रीय विमानतळापासून सहा किलोमीटरवर यमुना एक्स्प्रेस वे-औद्योगिक विकास प्राधिकरण क्षेत्रात फिल्मसिटीची घोषणाही करण्यात आली आहे.
-----------------------