औरंगाबाद : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या कार्यक्रमाला हजर राहण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे नकार दिला. त्यांची ऑनलाईन हजेरी देशभक्ती, तर माझी गैरहजेरी राष्ट्रदोह का? असे सवाल करणारे टष्ट्वीट खा. इम्तियाज जलील यांनी केले आहे.
जिल्ह्याचे खा. इम्तियाज जलील यांची मराठवाडा मुक्तिसंग्रामदिनी गैरहजर राहण्याची परंपरा यंदाही कायम राहिली. खा. जलील हे संसद अधिवेशनासाठी दिल्लीत आहेत; परंतु त्यांनी टिष्ट्ववटरद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टीकेचे लक्ष्यकरून शिवसेनेला डिवचले आहे. पहिल्या टष्ट्वीटमध्ये ते म्हणतात, शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कार्यक्रमाला येण्यास स्पष्ट नकार दिला. मराठवाड्याबद्दल माझ्या सचोटी आणि निष्ठेवर प्रश्न विचारणारे मुख्यमंत्र्यांना प्रश्न का करीत नाहीत. यालाच मी दुहेरी मापदंड म्हणतो, तर दुसऱ्या टष्ट्वीटमध्ये ते म्हणतात, मराठवाडा मुक्तिसंग्राम कार्यक्रमात माझी अनुपस्थिती म्हणजे राष्ट्रविरोधी आणि मुख्यमंत्र्यांची अनुपस्थिती म्हणजे देशभक्ती का? आता निष्ठेचे प्रमाणपत्र देणारे आणि माध्यम गप्प का आहेत?
सिद्धार्थ उद्यानातील मुख्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपल्यानंतर खा. जलील यांच्या विरोधात काही तरुणांनी जोरदार घोषणाबाजी करीत त्यांचा निषेध केला, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: कार्यक्रमाला येणे अपेक्षित असताना त्यांनीही आॅनलाईन संदेश देत विभागाच्या भावनांचा अवमान केला, असा आरोप करीत युवक घोषणा देत होते. मराठवाडा विकास मंच या संघटनेच्या दत्तात्रय जांभूळकर, सागर शिंदे, गोविंद देशपांडे यांनी मुख्यमंत्री आणि जलील यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
आजवर सतत गैरहजर राहिले खा. जलील२०१५ पासून इम्तियाज जलील हे लोकप्रतिनिधी आहेत. आॅक्टोबर २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यापासून मे २०१९ मध्ये लोकसभेवर निवडून गेले तरी त्यांनी मराठवाड मुक्तिसंग्राम दिनाला एकदाही हजेरी लावली नाही. जलील हे एमआयएम या पक्षाचे नेतृत्व करतात, हैदराबादस्थीत एमआयएमचे ध्येयधोरण निजाम धार्जीने असल्याने ते या कार्यक्रमाला हजर राहत नसल्याचा आरोप सातत्याने त्यांच्यावर केला जातो.
रझाकारी विचारांनी भारलेल्यांनी देशभक्ती शिकविण्याची गरज नाहीठाकरे यांना खा. जलील यांच्यासारख्या रझाकारी विचारांनी भारलेल्यांनी देशभक्ती शिकविण्याची गरज नाही. मागील पाच वर्षांपासून ते या कार्यक्रमाला गैरहजर राहत आहेत. खा. जलील यांनी टष्ट्वीटद्वारे शुभेच्छा दिल्या असत्या, तर त्या सर्वांनी स्वीकारल्या असत्या. सोशल मीडियातून असे व्यक्त होणे हीदेखील रझाकारी पद्धतच आहे. त्यांच्या पक्षाचा विचार जगाला माहिती आहे. गैरहजर राहून जलील यांनी रझाकारी दाखविली आहे, असे प्रत्युत्तर शिवसेना आ. अंबादास दानवे यांनी खा. जलील यांना दिले आहे.