लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महापौर निवडणुकीत सेनेसोबत कोणतीही दगाबाजी न करता चुपचाप मतदान करावे, असा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील आठवड्यात भाजपच्या स्थानिक पदाधिका-यांना दिला. या आदेशानंतरही शनिवारपासून भाजपमध्ये गुप्त बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. महापौरपदासाठी इच्छुक असलेल्या भाजपमधील काही नगरसेवकांकडून हा सर्व खेळ सुरू आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला बगल देऊन तिसरा मार्ग निवडल्यास पदाधिका-यांना त्याची किंमतही चुकवावी लागणार आहे.३० आॅक्टोबर रोजी महापौरपदासाठी निवडणूक घेण्यात येणार आहे. निवडणुकीसाठी कार्यक्रमही जाहीर झाला आहे. भाजपकडून फक्त उपमहापौरपदासाठी उमेदवार जाहीर करणे बाकी आहे. उमहापौरपदी कोणाची वर्णी लावावी याचा शोध घेण्याचे सोडून शनिवारपासून स्थानिक पदाधिकारी गुप्त बैठकांवर अधिक भर देत आहेत. शनिवारी रात्री भोकरदनला एक बैठक घेण्यात आली. या बैठकीत थेट मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला बगल न देता वेगवेगळ्या पर्यायांचा विचार करण्यात आल्याचे कळते. रविवारी दुपारी महापौर बंगल्यावर परत एक बैठक घेण्यात आली.या बैठकीतही तिसरा मोर्चा उघडण्यासंदर्भात गुप्त चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. या सर्व बैठका भाजपमधील इच्छुक उमेदवारांनी घडवून आणल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्र्यांचा आदेश मोडण्याची हिंमत स्थानिक नेते अजिबात करणार नाहीत;
मुख्यमंत्र्यांचे आदेश; भाजपमध्ये चलबिचल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 1:25 AM