पावसामुळे तसेच अस्वच्छतेमुळे डासांचे प्रमाण वाढले असून, यामुळे डेंग्यू व चिकुनगुनियाच्या रुग्णांनी खासगी दवाखाने फुल दिसत आहेत. यासोबतच सर्दी, खोकला, तापाचे रुग्णही परिसरात मोठ्या संख्येने वाढले आहेत. एडिस इजिप्टाय या डासामुळे डेंग्यूचा प्रसार होतो. हा डास दिवसा चावतो, थोड्या पाण्यामध्येही या डासांची पैदास वाढते. त्यामुळे घरातील नियमित स्वच्छता करा. सोबतच घराजवळचा परिसरही स्वच्छ ठेवा, कुठेही पाणी जमा राहणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. मुरमुरे यांनी केले आहे, तर डेंग्यूचा ताप चार ते पाच दिवस राहतो. यात ‘प्लेटलेट्स’ कमी होण्याचे प्रमाण वाढते. यामुळे रुग्णाला धोका निर्माण होतो. त्यामुळे लक्षणे जाणवल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन डॉ. नयन कुमार मोरे यांनी केले.
लोणी खुर्द परिसरात चिकुनगुनिया, डेंग्यूचे रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2021 4:05 AM