शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकींची गाेळ्या झाडून हत्या; ३ गोळ्या लागल्या, दोघे ताब्यात
2
मला हलक्यात घेऊ नका, मी पळणारा नाही तर पळवणारा; विधानसभेवर पुन्हा महायुतीचा भगवाच फडकणार - CM शिंदे
3
दोन महिने थांबा, सत्तेत येतोय; कोणालाही सोडणार नाही...; दसरा मेळाव्यात ठाकरेंचे मुख्यमंत्री म्हणूनच ‘प्रोजेक्शन’
4
अंतराळातून टेहळणीसाठी भारत प्रक्षेपित करणार तब्बल ५२ उपग्रह; पाकिस्तान-चीनच्या हालचालींवर ठेवणार करडी नजर
5
दसऱ्याच्या दिवशी ईडीची छापेमारी, रांचीत खळबळ
6
जातीच्या आधारावर संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न; विजयादशमी उत्सवात डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केली चिंता 
7
वेड्यावाकड्या युती अन्‌ आघाड्यांना धडा शिकवा; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आवाहन
8
बांगलादेशमध्ये दुर्गापूजेशी संबंधित ३५ अनुचित घटना, भारताची तीव्र शब्दांत नाराजी
9
पाक-चीन संबंध बिघडविण्यासाठीच ‘ताे’ बाॅम्बस्फाेट
10
गरज पडेल तेव्हा शक्तिनिशी शस्त्रांचा वापर : संरक्षणमंत्री
11
बागमती एक्स्प्रेस दुर्घटना बालासोरसारखीच!
12
ओटीटी कंटेंटवर हवे नियंत्रण, कायदा करा; सिंगल यूज प्लॅस्टिक नको - सरसंघचालक 
13
मागास, वंचितांना त्रास देणाऱ्यांचा हिशेब घेणार; पंकजा मुंडे कडाडल्या; धनंजय मुंडे पहिल्यांदाच दसरा मेळाव्यास हजर
14
या समाजाचा अपमान केला तर उलथवून टाकू; जरांगेंनी दंड थोपटले; नारायणगडावर विराट जनसमुदाय
15
दीक्षाभूमीवर निनादला क्रांतीचा नारा ‘जय भीम’; समतेची मशाल घेत देश-विदेशातून दाखल झाला जनसागर
16
केवळ चौकशी नको, आता पायउतार व्हा; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर शरद पवार आक्रमक!
17
Baba Siddique: राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांची मुंबईत गोळ्या झाडून हत्या; घटनेनं राज्यभर खळबळ
18
१५ दिवसांपूर्वी धमकी अन् Y दर्जाच्या सुरक्षेतही बाबा सिद्दिकींची हत्या; मुंबईतील रस्त्यावर नेमकं काय घडलं?
19
टीम इंडियाची 'विजया दशमी'! दहाव्यांदा प्रतिस्पर्धी संघाला क्लीन स्वीप देत जिंकली मालिका

चिमणी गायब, तरीही चिंता, 25 टक्के महिलांना छळाचा ‘चटका’

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2023 12:36 PM

काही वर्षांपूर्वी चिमणी (रॉकेलचा वापर करून उपयोगात आणला जाणारा छोटा दिवा)  पडून अंगावर भाजल्या जाण्याच्या घटना अधिक होत असत.  आता घरांतून चिमणी गायब झाली आहे.

- संतोष हिरेमठछत्रपती संभाजीनगर - काही वर्षांपूर्वी चिमणी (रॉकेलचा वापर करून उपयोगात आणला जाणारा छोटा दिवा)  पडून अंगावर भाजल्या जाण्याच्या घटना अधिक होत असत.  आता घरांतून चिमणी गायब झाली आहे. मात्र, आजही महिला भाजल्या जाण्याच्या घटना घडतच आहेत. आजही २५ टक्के महिलांना छळाचा ‘चटका’ सोसावा लागत असल्याचे समोर आले आहे.

शहरात आंतरराष्ट्रीय पातळीवरील ‘रिकन्स्ट्रक्टिंग वूमेन इंटरनॅशनल’तर्फे महिलांसाठी मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिर घेण्यात येत आहे. यासाठी हंगेरी आणि फिनलंड येथील महिला प्लास्टिक सर्जन, भूलतज्ज्ञ शहरात आले आहेत. या तज्ज्ञांमध्ये डाॅ. औटी इर्मेली कार्रेला, डाॅ. लेवी बर्नडेट, डाॅ. हेली कावोला, डाॅ. सिसको करिना मेंटिला या तज्ज्ञांचा समावेश आहे. 

शिबिरात प्लास्टिक सर्जरी होणाऱ्या एकूण महिलांमध्ये २५ टक्के महिला या घरगुती हिंसाचाराला बळी पडलेल्या आहेत. मात्र, अनेक महिला हिंसाचारानंतरही कुणाचेही नाव घेत घेण्यास तयार नाहीत.  भाजण्यामागे वेगवेगळी कारणे सांगितली जातात  असे तज्ज्ञांनी सांगितले.  

महिलांनो, अशी घ्या काळजी - स्टोव्ह, गॅस, शेगडी हे जमिनीवर ठेवून स्वयंपाक करता कामा नये. यातून अपघाताचा धोका वाढतो. त्यामुळे या गोष्टी उंच ओट्यावर, किचन ओट्यावर ठेवूनच स्वयंपाक करावा.- गॅस शेगडीला असलेली रबरी नळी वेळोवेळी बदलावी. गॅस शेगडीही नियमितपणे तपासावी.- लहान मुले घरात असतील तर स्वयंपाक घरापासून त्यांना दूरच ठेवावे.

युरोपीयन देश अन् भारतात फरक जळीत रुग्णांचे प्रमाण भारतापेक्षा परदेशात २० टक्क्यांनी कमी आहे. युरोपियन देशात केरोसिनचा वापर होत नाही. स्वयंपाकघरही सुरक्षित असतात.  - डाॅ. लेवी बर्नडेट, प्लास्टिक सर्जन, हंगेरी

दुर्घटनांमुळे भाजणे वाढलेघरगुती हिंसाचारामुळे भाजल्या जाणाऱ्या महिलांच्या प्रमाणात गेल्या काही वर्षांत लक्षणीय घट झालेली आहे. दुर्घटनेमुळे भाजल्या जाण्याच्या घटना वाढत आहेत. स्वयंपाक करताना महिलांनी थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. - डाॅ. रमाकांत बेंबडे, बर्न्स स्पेशालिस्ट

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रSocialसामाजिक