अंबड : तालुक्यातील चिंचखेड येथे मध्यरात्रीनंतर दोन वाजता चोरट्यांनी शेतकऱ्याच्या घरावर दरोडा टाकून सव्वा लाखांची लूट केल्याची घटना मंगळवारी घडली. चोरट्यांनी दरवाजाची कडी वाकवून घरात प्रवेश केला. पत्राच्या पेटीमध्ये ठेवलेली १ लाख २८ हजार रुपयांची रक्कम व महत्त्वाची कागदपत्रे चोरून घेऊन जात असताना फिर्यादी आसाराम तात्याबा भोजने यांनी चोरांना प्रतिकार केला.भोजने यांना चोरांनी दगडफेक करून जखमी केले. यात भोजने यांच्या डोक्याला चार टाके पडलेत. चार अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दखल झाला आहे.या घटनेचा तपास एपीआय राजपूत करीत आहे. जालना येथील श्वान पथकाने परिसरात शोध घेतला परंतु अद्याप धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले नाहीत. या घटनेमुळे गावासह परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. जामखेड चौकीचे जमादार राठोड यांनी गावात बंदोबस्त ठेवला होता. (वार्ताहर)
चिंचखेडला सव्वा लाख रुपयांची धाडसी चोरी
By admin | Published: August 18, 2016 12:42 AM