औरंगाबाद : महाराष्ट्र शासनाच्या २०१९ ते २०२४ पर्यंतच्या औद्योगिक धोरणाच्या अनुषंगाने आंतरराष्ट्रीय पातळीवरील चीन येथील वॅनफेंग आॅटो होल्डिंग गु्रप हा उद्योग औरंगाबादेतील आॅरिक सिटीमध्ये गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहे. गुंतवणुकीच्या अनुषंगाने कंपनीच्या एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी उदय चौधरी यांची गुरुवारी भेट घेऊन गुंतवणुकीपूर्वी शहरातील समस्या जाणून घेतल्याचे वृत्त आहे.आॅरिक सिटीचे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी नामदेव जाधव यांच्यासोबत कंपनीच्या चार वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आज जिल्हाधिकाºयांची भेट घेतली. कंपनीने गुंतवणुकीपूर्वी एक सर्व्हे सुरू केला आहे. त्या सर्व्हेमध्ये शहरातील भौगोलिक व इतर सामाजिक माहिती संकलित केली जात आहे. शहराच्या समस्या म्हणून नव्हे तर कंपनीने थोडक्यात शहराच्या माहिती संकलनासाठी पाहणी सुरू केली आहे, असे सूत्रांनी सांगितले.किया मोटार्स या अँकर प्रोजेक्टसह एलजी कंपनी आॅरिकमध्ये येता-येता राहिली. येथील औद्योगिक वसाहतींत आॅटोमोबाईल्स आणि इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील उत्पादन करणाºया कंपन्या आहेत. त्यामुळे एलजी किंवा किया मोटार्ससारखे उद्योग येथे आले असते, तर व्हेंडर डेव्हलपमेंटसाठी मोठी चालना मिळाली असती. ह्योसंग या वस्त्रोद्योगातील कंपनीचे बांधकाम सध्या आॅरिकमध्ये सुरू आहे. वॅनफेंग आॅटो होल्डिंग हा गु्रप आॅरिकमध्ये आल्यास मोठ्या प्रमाणात व्हेंडर डेव्हलपमेंटला चालना मिळणे शक्य होईल.काय उत्पादन आहे वॅनफेंगचेचीन येथील वॅनफेंग आॅटो होल्डिंग गु्रपने औरंगाबाद, रायगड आणि तळेगाव येथील औद्योगिक वसाहतीतील जागांचा विचार केला आहे. अॅल्युमिनिअम अलॉय व्हील्सचे उत्पादन करणारी ही कंपनी सुमारे ४ हजार ५०० कोटी रुपये गुंतवणूक करून उद्योग उभारण्याचा विचार करीत आहे. सदरील कंपनीला १०० ते २०० एकर जागेची गरज आहे. शेंद्रा एमआयडीसी लगत असलेल्या आॅरिक सिटीमध्ये मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध आहे. कंपनीचे उत्पादन युरोप व इतर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जाते. मशीन टूल्स, इलेक्ट्रिक बससाठी लागणाºया उपकरणांचे उत्पादन ही कंपनी करते. शिवाय आॅटोमोबाईल्स क्षेत्रातील उत्पादनेही ही कंपनी करते. कंपनीचे शिष्टमंडळ चार दिवस शहरातशिष्टमंडळाने औरंगाबादेतील डीएमआयसीच्या शेंद्रा नोडची चाचपणी सुरू केली आहे. जिल्हाधिकाºयांशी शिष्टमंडळाने औरंगाबादच्या औद्योगिक विश्वाबाबत आणि शहराबाबत माहिती जाणून घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. चार दिवस शिष्टमंडळ शहरात असणार आहे. सहा महिन्यांपासून कंपनी औरंगाबादचा अभ्यास करीत आहे. या कंपनीने येथील वातावरण आणि अडचणींचा अभ्यास सुरू केला आहे. गुरुवारी शिष्टमंडळाने जिल्हाधिकाºयांशी औरंगाबादेतील वातावरणाची माहिती जाणून घेतली. चीनच्या झिनचँग काऊंटीमध्ये मुख्यालय असलेली ही कंपनी प्रामुख्याने आॅटो, एरोस्पेस, लष्करी सामग्री आदी गोष्टींची निर्मिती करण्यात अग्रेसर आहे. बारा हजार जणांना रोजगार देणारी ही कंपनी चीनच्या अव्व्ल ३० उद्योगांपैकी एक आहे. सुमारे १०० ते २०० एकरवर उद्योग उभारण्याचा मानस असलेली ही कंपनी औरंगाबादेत ४ हजार जणांना रोजगार उपलब्ध करून देऊ शकते.
चीनच्या कंपनीने गुंतवणुकीपूर्वी सुरू केला आहे सर्व्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 11:03 PM
औरंगाबाद : महाराष्ट्र शासनाच्या २०१९ ते २०२४ पर्यंतच्या औद्योगिक धोरणाच्या अनुषंगाने आंतरराष्ट्रीय पातळीवरील चीन येथील वॅनफेंग आॅटो होल्डिंग गु्रप ...
ठळक मुद्देउद्योग : गुंतवणुकीपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून जाणून घेतली शहराची माहिती