लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : चीन येथील बॉसको कंपनीच्या चार अधिकाºयांनी शुक्रवारी शहरातील सलीम अली सरोवर, नारेगाव कचरा डेपोची पाहणी केली. कंपनी लवकरच महापालिकेला दूषित पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी पायलट प्रोजेक्ट म्हणून प्रकल्प अहवाल सादर करणार आहे. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर महापालिका विचार करणार आहे.महापालिकेचे आयुक्त डी. एम. मुगळीकर, महापौर बापू घडामोडे यांच्यासह इतर नगरसेवकांनी मागील महिन्यात चीन दौरा केला होता. तेथील ड्युनहाँग आणि इतर शहरांना मनपाच्या पथकांनी भेटी दिल्या होत्या. या दौºयात चीनमध्ये दूषित पाण्यावर प्रक्रिया करणाºया बॉसको कंपनीला मनपाने औरंगाबादेत येण्याचे निमंत्रण दिले होते. शुक्रवारी कंपनीचे चार अधिकारी मनपात दाखल झाले. यामध्ये ली सियुआन, अभिजित चौधरी, हुआंग बिंगग्युई, लिऊ क्रियाहोंग यांचा समावेश होता. कंपनीचा हा खाजगी दौरा होता, हे विशेष. आयुक्त मुगळीकर यांच्या कक्षात त्यांनी पॉवर पॉइंट पे्रझेंटेशन दिले. चीनमधील विविध शहरांमध्ये दूषित पाण्यावर कंपनी कशा पद्धतीने काम करते यावर सविस्तर मार्गदर्शन केले. चीनमध्ये दूषित पाणी शेतीसाठी वापरण्यात येत असल्याचे सांगण्यात येते. दूषित पाणी पिण्यायोग्य तयार करण्यात येते. यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा कशा पद्धतीने वापर करण्यात येतो, यावरही अधिकाºयांनी सविस्तरपणे प्रकाश टाकला.औरंगाबादेत पायलट प्रोजेक्ट म्हणून काम करण्याची तयारीही कंपनीने दर्शविली. यासाठी लागणारा ४० टक्के खर्च कंपनी करण्यास तयार असल्याचे अधिकाºयांनी नमूद केले. प्रकल्प बीओटीवरही करण्याची तयारी कंपनीने दाखविली. यासंदर्भात लवकरात लवकर प्रकल्प अहवाल सादर करण्याची सूचना आयुक्त मुगळीकर यांनी केली. चीनचे पथक महापालिकेतून थेट सलीम अली सरोवर पाहण्यासाठी गेले. तेथे दूषित पाण्यावर कशा पद्धतीने प्रक्रिया होते याची पाहणी केली. कंपनी दूषित पाण्यावर प्रक्रिया करण्यात तरबेज आहे. मनपाच्या गरजा लक्षात घेऊन भविष्यात कोणत्याही प्रकारच्या सेवा देण्यास कंपनीने सहमती दर्शविली. यावेळी शहर अभियंता सिकंदर अली, प्रभारी कार्यकारी अभियंता अफसर सिद्दीकी यांच्यासह मनपा अधिकारी उपस्थित होते.
पाहुण्यांनी दाबले नाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2017 12:59 AM