लोकमत न्यूज नेटवर्ककन्नड : येथील गौताळा अभयारण्यात दुर्मिळ ‘चितळ’ प्रजातीचे हरिण आढळून आहे. यावरून अभयारण्याचा दर्जा वाढल्याचे जाणकारांनी मत व्यक्त केले आहे.येथील सहायक वन्यजीवरक्षक आर.ए. नागापूरकर, नागदचे वनक्षेत्रपाल बी.बी. जºहाड हे अभयारण्यात गस्तीवर असताना मंगळवारी (दि.९) सकाळी ६ वाजता वाजेच्या सुमारास कक्ष क्र. १५३ मध्ये त्यांना चितळ आढळून आले. त्यांनी त्वरित या चितळाचे छायाचित्र कॅमेºयात कैद केले.वन्यजीवरक्षक रत्नाकर नागापूरकर यांनी सांगितले की, ‘चितळ’ हे मध्यम आकाराचे हरिण आहे. दिसायला ते अतिशय सुंदर असते. त्याच्या दोन उपप्रजाती आहेत. ताशी ६५ कि.मी. वेगाने धावण्याची त्याची क्षमता असते. गौताळा अभयारण्यात त्यांचा अधिवास म्हणजेच सुरक्षेत वाढ झाल्याचे फलित आहे.गौताळ्यात चितळ आढळून येणे म्हणजे अधिवासात होणारे सकारात्मक बदल आहेत, अशी प्रतिक्रिया निवृत्त उपवन संरक्षक राजेंद्र धोंगडे यांनी दिली आहे. यामुळे वनप्रेमी वृद्धीस मदत होईल.
गौताळ्यात ‘चितळा’चे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 1:16 AM