शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

'मोबाइलमुळे नाही उडाली चिऊताई भुर्र...'; चिमण्यांची संख्या रोडावण्याची 'ही' आहेत कारणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 1:28 PM

दि नेचर फॉरएव्हर सोसायटी या भारतीय संस्थेच्या पुढाकाराने २०१० पासून दरवर्षी जागतिक चिमणी दिवस साजरा केला जात आहे.

ठळक मुद्दे२० मार्च हा दिवस जागतिक चिमणी दिवस म्हणून ओळखला जातो.चिमण्यांची कमी होत जाणारी संख्या पर्यावरणाचा बिघडत जाणारा समतोल दर्शवते.

औरंगाबाद : 'मोबाइल टॉवर शहरभर पसरले आणि त्याच्यापासून निघणाऱ्या रेडिएशनमुळे चिमण्यांची संख्या झपाट्याने कमी होऊ लागली...' हे आपण आजवर ऐकत आलो आणि मानत आलो आहोत. पण या चिऊताईला मोबाइलनेच भुर्रर्र उडवून लावलेले आहे, याचे अजूनतरी कोणतेही पुरावे नाहीत, असे स्टेट ऑफ इंडियाज बर्ड्स या संस्थेसह इतरही पक्षी अभ्यासकांचे मत आहे. 

२० मार्च हा दिवस जागतिक चिमणी दिवस म्हणून ओळखला जातो. चिमण्यांची संख्या झपाट्याने कमी होत जाणे, चिंताजनक आहे. म्हणूनच चिमणीविषयी जागरूकता निर्माण व्हावी, या हेतूने दि नेचर फॉरएव्हर सोसायटी या भारतीय संस्थेच्या पुढाकाराने २०१० पासून दरवर्षी जागतिक चिमणी दिवस साजरा केला जात आहे. चिमण्यांची कमी होत जाणारी संख्या पर्यावरणाचा बिघडत जाणारा समतोल दर्शवते.चिमणी हा मनुष्य वस्तीच्या आधारानेच राहणारा पक्षी आहे. चिमणीचे घरटे झाडांपेक्षा जास्त भिंतींवर, कौलांवर, छतावर, असे मानवी घराच्या आडोश्याच्या ठिकाणी जास्त आढळून येते. आता सगळीकडे सिमेंटची घरे होत असल्याने माती, कौलं नाहीसे होत असल्याने चिमण्यांची घरटी नष्ट होत चालली असल्याने त्या शहरापासून दूर जात आहेत, हे चिमण्यांची संख्या कमी होण्याचे सगळ्यात महत्त्वाचे कारण आहे, असे स्टेट ऑफ इंडियाज बर्ड्स या संस्थेच्या २०२० सालच्या अहवालात सांगण्यात आले आहे.

६० ते ७० टक्क्यांनी चिमण्यांची संख्या घटलीमोबाइलच्या उंच टॉवरवरच काही पक्ष्यांनी घरटी बांधलेली दिसतात. त्यामुळे मोबाइलमधून निघणाऱ्या रेडिएशनमुळे चिमण्यांची संख्या घटते आहे, असे नाही. चिमण्या कमी झाल्या, याचे मुख्य कारण म्हणजे सिमेंट काँक्रीटचे वाढलेले जंगल. यामुळे चिमण्यांना घरटे बांधायला सुरक्षित जागा राहिलेली नाही. तसेच गवत, झुडपं नष्ट होत चालल्याने किडे, दाणे हे अन्नही चिमण्यांना शहरात योग्य प्रमाणात मिळत नाही. त्यामुळे चिमण्यांची संख्या शहरातून कमी होत आहे. मागील काही वर्षांच्या तुलनेत ६० ते ७० टक्क्यांनी चिमण्यांची संख्या घटली आहे.- डॉ. किशोर पाठक, पक्षीतज्ञ 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादenvironmentपर्यावरणNatureनिसर्ग