शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
2
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
3
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
4
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
5
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
6
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
7
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
8
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
9
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
10
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
11
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
12
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
14
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
16
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
17
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
18
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
19
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
20
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य

आरक्षणामुळे सरपंचपदाची निवड सरळ; मात्र उपसरपंच पदासाठी दिसली चुरस 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 6:03 PM

Grampanchayat Election तालुक्यातील बहुतांशी ग्रामपंचायतीवर काँग्रेसची सत्ता

- श्रीकांत पोफळेकरमाड  : नुकत्याच सरपंच व उपसरपंच पदासाठी झालेल्या निवड प्रक्रियेत औरंगाबाद तालुक्यातील आरक्षित जागांमुळे सरपंचपदी बहुतेक ठिकाणी अपेक्षित व्यक्तींचीच निवड करण्यात आली. दरम्यान, तालुक्यातील बहुतांश भागात मात्र उपसरपंच पदासाठी मोठी रस्सीखेच बघायला मिळाली. औरंगाबाद तालुक्यातील बहुतांशी ग्रामपंचायतीवर काँग्रेस पक्ष्याची एकहाती सत्ता आल्याने त्यासर्वच ग्रामपंचायतवर काँग्रेस पक्षाच्या अपेक्षितांची वर्णी लागली.

तालुक्यातील शेंद्रा पंचतारांकीत औद्योगिक वसाहत व डीएमआयसीमुळे कुंभेफळ , करमाड, पिसादेवी, शेंद्रा कमंगर व शेंद्राबन या आर्थिक सुबत्ता पात्र असलेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागुन होते. सोबतच या औद्योगिक वसाहतीला लागुन असलेल्या व तालुक्यातील मोठ्या लोकसंख्येची गावे असलेल्या पिंप्रीराजा, शेकटा, भांबर्डा, वरूड, वडखा, वरझडी, भालगाव आदी गावांचा कारभारही कुणाकडे जातो हा चर्चेचा विषय होता.  दरम्यान, या सर्व गावांत अपेक्षे प्रमाणेच सरपंचाची निवड झाली. औरंगाबाद तालुक्यातील बहुतांशी ग्रामपंचायतीवर काँग्रेस पक्ष्याची एकहाती सत्ता आल्याने त्यासर्वच ग्रामपंचायतवर काँग्रेस पक्षाच्या अपेक्षितांची वर्णी लागली.  काही ठिकाणी मात्र अपेक्षित असलेल्या उपसरपंचाच्या जागेवर दुसर्‍यानेच बाजी मारल्याचे दिसून आले.

सर्व गावांमध्ये अपवादात्मक एखाद- दुसर्‍या ठिकाणी किरकोळ वादावादी वगळता शांततेत मतदान पार पडले. यात बहुतांश ठिकाणी हात वर करूनच मतदान प्रक्रिया पार पडली. अपवादात्मक ठिकाणी गुप्त मतदान प्रक्रियेद्वारे मतदान घ्यावे लागले. चिकलठाणा व करमाड पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकांनी पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या मार्गदर्शनात आपल्या सहकार्‍यांच्या मदतीने चोख बंदोबस्त ठेवला होता. निवड प्रक्रियेनंतर समर्थकांनी गुलालाची उधळण करीत नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंचांचे स्वागत करतांनाचे चित्र दिसून आले. यात नवनियुक्त सदस्य, पॅनल प्रमुख व गावातील प्रमुख व्यक्तींचेही स्वागत होतांना दिसून आले. 

◆ तालुक्यातील प्रमुख गावांतील सरपंच व उपसरपंच :◆ करमाड - सरपंचपदी कैलास उकिर्डे,  उपसरपंचपदी रमेश कुलकर्णी यांची निवड--------------------------------------------------◆ पिसादेवी - सरपंचपदी राजेश रघुनाथ काळे, उपसरपंच सत्तार सरदार शेख यांची निवड--------------------------------------------------◆ झाल्टा - सरपंचपदी वर्षा बद्री शिंदे तर उपसरपंचपदी राधिका मुकुंद शिंदे यांची निवड..--------------------------------------------------◆ वरझडी - सरपंचपदी दिलीप जिजाराव पठाडे, उपसरपंचपदी कविता हरिभाऊ पठाडे यांची निवड--------------------------------------------------◆ वरुडकाजी - सरपंच डॉ. दिलावर मिर्झा बेग, संजय हरिचंद्र फोके यांची निवड--------------------------------------------------◆ शेवगा - सरपंचपदी ढवळाबाई तुळशीराम चव्हाण, उपसरपंचपदी श्रीमंत आनंदराव उकिर्डे यांची निवड--------------------------------------------------◆ पिंप्रीराजा - सरपंचपदी वैशाली उदयराज पवार, उपसरपंचपदी सय्यद मोसिन यांची निवड--------------------------------------------------◆ कुंभेफळ - सरपंचपदी कांताबाई सुधीर मुळे, उपसरपंचपदी मनीषा ज्ञानेश्वर शेळके यांची निवड--------------------------------------------------◆ शेकटा - सरपंचपदी अक्षया बाबासाहेब वाघ, उपसरपंचपदी सुनिता सुभाषराल वाघ यांची निवड--------------------------------------------------◆ शेंद्रा कमंगर - सरपंचपदी पुष्पा नामदेव कचकुरे, उपसरपंचपदी सर्जेराव कचकुरे यांची निवड--------------------------------------------------◆ गाढे जळगाव - सरपंच पदी बद्रुनीसा अब्दुल रहीम पठाण व  उप सरपंच अर्जुन गाढेकर यांची निवड--------------------------------------------------◆टोणगाव - सरपंच शिवाजी एकनाथ पाडसवान,  उपसरपंच गणेश दामोधर चौधरी यांची निवड--------------------------------------------------◆ शेंद्राबन, गंगापूर-जहांगीर - सरपंचपदी विमल साळुबा भावले , उपसरपंचपदी विजय पांडुरंग गायके यांची निवड--------------------------------------------------◆ कोळघर - सरपंचपदी जोती डीघुळकर , उपसरपंचपदी शेख हलीमा यांची निवड.--------------------------------------------------◆ वाडखा - सरपंचपदी बबिता नंदकुमार काकडे, उपसरपंचपदी तूळसाबाई नागोराव काकडे यांची निवड--------------------------------------------------◆ गारखेडा नंबर 1 - सरपंचपदी रमेश बनसोडे, उपसरपंचपदी शिवकला चौधरी यांची निवड--------------------------------------------------◆ आडगाव बु - सरपंचपदी गोरख निकम, उपसरपंचपदी ज्ञानेश्वर लोखंडे यांची निवड--------------------------------------------------◆ चितेगाव - सरपंचपदी शोभा पवार उपसरपंचपदी मनोहर झिंजुर्डे यांची निवड--------------------------------------------------◆ चितेपिंपळगाव - सरपंचपदी वंदना सोनवणे, उपसरपंचपदी नंदकिशोर बागडे यांची निवड--------------------------------------------------◆ भालगाव - सरपंचपदी छाया कोल्हे, उपसरपंचपदी भाऊसाहेब देवकर यांची निवड--------------------------------------------------◆ आप्पतगाव - सरपंचपदी बबाबाई मोरे , उपसरपंचपदी धनंजय भोसले यांची निवड--------------------------------------------------◆कचनेर - सरपंचपदी कमलाबाई फतपुरे, उपसरपंचपदी मुकेश चव्हाण यांची निवड

टॅग्स :sarpanchसरपंचAurangabadऔरंगाबादElectionनिवडणूक