शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
2
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
3
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
4
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
5
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
6
गौतम अदानींना ज्यांनी तारलं, त्यांनाच अमेरिकेत बसला लाखो डॉलर्सचा दंड; कारण काय?
7
IND vs BAN : जा रे जारे पावसा! दुसऱ्या दिवसाचा बहुतांश खेळ पाहण्यात नव्हे पाण्यात जाणार?
8
त्रिग्रही बुधादित्य राजयोग: ७ राशींना अनुकूल, सरकारी कामात लाभ; उत्पन्नात वाढ, मनासारखा काळ!
9
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
10
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
11
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
12
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर
13
आज शेअर बाजार खुला राहणार, NSE वर होणार विशेष ट्रेडिंग सेशन; कारण काय?
14
Zomatoच्या सह-संस्थापक आकृती चोप्रा यांचा राजीनामा; १३ वर्षाचा प्रवास थांबला, पाहा त्यांची Networth किती?
15
Bigg Boss Marathi Season 5: राखी सावंतची घरात एन्ट्री! 'ड्रामा क्वीन'ला पाहून निक्कीची झाली अशी अवस्था; प्रोमो व्हायरल
16
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
17
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
18
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
19
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
20
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा

छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘चोरी चोरी चुपके चुपके’ कोकेन, ब्राऊन शुगर, चरसची ‘कश’

By संतोष हिरेमठ | Published: June 26, 2023 1:17 PM

छत्रपती संभाजीनगरात वाढतेय नशेखोरी : स्वस्त, सहज उपलब्ध होणाऱ्या पदार्थासह महागड्या पदार्थांचीही नशा

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये नशेखाेरी दिवसेंदिवस वाढत आहे. मद्यपान, गांजापाठोपाठ नशेसाठी स्टिक फास्ट, झोपेच्या गोळ्यांचे सेवन तर वाढतच आहे. परंतु शहरातील तरुणाई कोकेन, ब्राऊन शुगर, चरसच्या विळख्यात सापडत आहे. उपचार घेऊन काहीजण वेळीच सावरतात. तर काहीजण स्वत:सह कुटुंबही उद्ध्वस्त करीत असल्याची चिंताजनक परिस्थिती आहे.शहरात मनोविकारतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञांकडे सुमपदेशनासाठी, उपचारांसाठी कोणकोणत्या पदार्थांचे व्यसन करणारे रुग्ण येतात, याची माहिती ‘लोकमत’ने जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा नशेसाठी

सहज उपलब्ध असलेल्या व्हाइटनर, बूट पॉलिशसाठी वापरले जाणारे पॉलिश, स्टिकफास्ट, आयोडेक्स, नेलपेंट, अगदी पेट्रोलचाही नशेसाठी वापर केला जात असल्याचे मनोविकारतज्ज्ञांनी सांगितलेच. परंतु, त्याबरोबर ब्राउन शुगर, चरस कोकेन, एमडी अशा अंमली पदार्थांची नशा करणेही रुग्ण येत असल्याचे सांगण्यात आले. शहरातील अडगळीत पडलेली ठिकाणे ही अशा प्रकारची नशा करण्याची अड्डा बनली आहेत. अल्पवयीन मुले बळी पडत असल्याने चिंता वाढली आहे.घाटीतील मनोविकृतीशास्त्र विभागातील स्थिती

व्यसनाचा प्रकार - महिन्याला साधारण रुग्ण- वर्षाला साधारण रुग्ण१) झोपेच्या गाळ्या- ४-४५२) गांजा- ४-४८३) स्टिक फास्ट-५-६०४) सिगोरट- १५-१८०५) तंबाखू-२५-३००

कुटुंबीयांची भूमिका महत्त्वाचीकुटुंबाची यात महत्त्वाची भूमिका ठरते. पालकांनी पाल्यांशी मैत्रीपूर्ण संवाद साधणे, छंद जोपासण्यासाठी प्रोत्साहित करणे, इंटरनेटच्या वापरावर मर्यादा ठेवणे आणि गरज असेल तर समुपदेशनाची मदत घेणे गरजेचे ठरते.- डाॅ. शलाका व्यवहारे, समाजसेवा अधीक्षक (मनोविकृती), घाटी

आठवडाभरात एक तरी चरस, ब्राऊन शुगरचा रुग्णआठवडाभरात चरस, ब्राऊन शुगरचे व्यसन असलेला एक तरी रुग्ण येतो. तर कोकेनचे व्यसन असलेला रुग्ण चार ते पाच महिन्यांत एखादा येतो. झोपेच्या गोळ्या, स्टिक फास्ट, पेट्रोलची नशा करणाऱ्यांची संख्या अधिक आहे.- डाॅ. मेराज कादरी, मनोविकारतज्ज्ञ

या पदार्थांची इच्छा, ही मनोविकृतीनशेसाठी विविध पदार्थांची इच्छा होते, याचा अर्थ ती मनोविकृती आहे. आनंद वाटावा म्हणून आणि इतर कारणांनी झोपेच्या गोळ्यांसह विविध पदार्थांचे सेवन केले जाते. परंतु, यापेक्षा फॅमिली डाॅक्टर अथवा मनोविकारतज्ज्ञांचा सल्ला घेणे हिताचे ठरेल.- डाॅ. प्रसाद देशपांडे, मनोविकृतीशास्त्र विभाग, घाटी.

ड्रग्सचे इंजेक्शन घेणारेहीआजकाल अंमली पदार्थांचे व्यसन करणारे रोज एक किंवा दोन नवीन रुग्ण येतात. तरुणांचे प्रमाण त्यात सर्वाधिक आहे. दारू आणि तंबाखू व्यतिरिक्त गांजा, हुक्काचे प्रमाण सर्वांत जास्त आहे. ड्रग्सचे इंजेक्शन घेणारेही अधूनमधून येतात.- डॉ. अमोल देशमुख, मनोविकारतज्ज्ञ.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDrugsअमली पदार्थAurangabadऔरंगाबाद