शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

तोतया सीआयडी गुन्हे शाखेच्या जाळ्यात

By admin | Published: July 16, 2014 1:12 AM

औरंगाबाद : उत्तर प्रदेशच्या एका व्यावसायिकाला सीआयडी असल्याची धमकी देऊन अनेकदा वसुली करणाऱ्या तोतया सीआयडीला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली.

औरंगाबाद : उत्तर प्रदेशच्या एका व्यावसायिकाला सीआयडी असल्याची धमकी देऊन अनेकदा वसुली करणाऱ्या तोतया सीआयडीला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून शहरातील चोऱ्या व लुटमारीच्या घटना उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. तोतया सीआयडीचे नाव गुरुदीप सिंह ऊर्फ लवी पिता हरविंदर सिंह (२७) असून, तो मयुबर कॉलनी, गादिया विहार रोड, दरगाह चौक परिसरात राहतो. त्याच्या विरोधात उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याविषयी गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त (प्रभारी) अविनाश आघाव यांनी दिलेली माहिती अशी की, उत्तर प्रदेशच्या राठ, जिल्हा हमीरपूर येथील मूळचा रहिवासी मोहंमद समशाद अहेमद या व्यापाऱ्याने टिळकनगर रोडवर रोपळेकर हॉस्पिटलसमोर ‘न्यू बिग कॉटन बाजार’ नावाने सेल लावला आहे. त्यात रेडिमेड कपडे, खेळणी, प्लास्टिकच्या वस्तू विक्रीसाठी ठेवल्या आहेत. हा सेल अनेक महिन्यांपासून सुरू आहे. १७ फेबु्रवारीला दुपारी ३ वाजेच्या सुमारास मॅनेजर सलीम जावेद शमीम खान काऊंटरवर होते. आरोपी गुरुदीप तेथे आला आणि विचारले की, मालक कुठे आहे, तेव्हा सलीम यांनी मोहंमद समशादकडे इशारा केला. तेव्हा आरोपी म्हणाला की, मी सीआयडी अधिकारी आहे आणि क्राईमचे काम करतो. विश्वास संपदान करण्यासाठी त्याने ओळखपत्रही दाखविले. तो यूपीच्या पोलिसासारखा दिसत होता. आरोपीचे राहणीमान आणि बोलण्याची पद्धत, बारीक पोलिसासारखी कटिंग पाहून तो सीआयडी पोलीस असल्याचा विश्वास बसला. त्यानंतर आरोपी सेल मालक मो. समशादला म्हणाला की, तुम्ही लोक यूपीतून बोगस माल आणून येथे विक्री करून लाखोचा कारभार करीत आहात.धंदा चौपट करीनतुमच्याकडे साहित्य विक्रीची कोणतीही परवानगी नाही, तरीदेखील बोगस कारभार करीत आहात. तुमच्यावर करवाई करून धंदा चौपट करून टाकण्याची धमकी दिली. हे ऐकून मालक घाबरला अन् आरोपीला बसवून त्याला चहापाणी करीत आवभगत केली. त्यानंतर त्याने आपले नाव गुरुदीप सिंह सांगून कारवाई न करण्यासाठी पाच हजारांची मागणी केली. सीआयडी अधिकारी समजून कारवाई टाळण्यासाठी समशाद याने ५ हजार रुपये देऊन सुटका केली. त्यानंतर दोन- तीन वेळा कधी १,५०० रुपये घेऊन गेला. ११ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता आरोपी पुन्हा सेलमध्ये आला आणि म्हणाला की मला ५ हजार अर्जंट द्या. त्यावेळी कर्मचाऱ्यांना शंका आली. ते म्हणाले की, मालक येथे नाही. तुम्ही मोबाईल नंबर देऊन जा. मालक आल्यावर बोलवून घेऊ, असे सांगितल्याने तो निघून गेला. सेल मॅनेजर सलीम जावेद याने गुन्हे शाखेला माहिती दिली. सहायक पोलीस आयुक्त अविनाश आघाव, सहायक फौजदार आयुब पठाण यांनी आरोपीला सेलवर येण्यासाठी फोन केला. सेलवरून फोन आल्याने आरोपी गुरुदीप पैसे घेण्यासाठी सेलवर आला अन् गुन्हे शाखेने त्याच्या मुसक्या बांधल्या. त्याच्या जवळून एक ओळखपत्र, त्यावर राष्ट्रीय पोलीस लिहिले आहे. एक स्प्लेंडर मोटारसायकल त्यावर ‘जय हिंद’ लिहिले आहे.