शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

खासगीत प्रॅक्टिस करणाऱ्या शासकीय रुग्णालयातील डाॅक्टरांची सीआयडी चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2021 4:36 PM

एका संघटनेतर्फे डाॅ. एस. पी. डांगे आणि घाटी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. काशीनाथ चौधरी यांचा सत्कार करण्यात आला. या सत्काराप्रसंगी बोलतानाचा व्हिडिओसमोर आला आहे.

ठळक मुद्देखासगी रुग्णालयात प्रॅक्टिस करणाऱ्या डाॅक्टरांसंदर्भात शासनाने उच्चस्तरीय चौकशी समिती नेमलेली आहे.खासगी रुग्णालयांचे एजंट घाटी, शासकीय दंत महाविद्यालयात रुग्णांच्या शोधार्थ फिरतात.

औरंगाबाद : खासगी रुग्णालयांत प्रॅक्टिस करणाऱ्या घाटी रुग्णालय आणि शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयातील डाॅक्टरांची ‘सीआयडी’मार्फत चौकशी केली जात असल्याचे शासकीय दंत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डाॅ. एस. पी. डांगे म्हणाले. त्यांच्या या धक्कादायक संवादाचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर व्हायरल झाला आहे.

एका संघटनेतर्फे डाॅ. एस. पी. डांगे आणि घाटी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. काशीनाथ चौधरी यांचा सत्कार करण्यात आला. या सत्काराप्रसंगी बोलतानाचा व्हिडिओसमोर आला आहे. खासगी रुग्णालयात प्रॅक्टिस करणाऱ्या डाॅक्टरांसंदर्भात शासनाने उच्चस्तरीय चौकशी समिती नेमलेली आहे. आमचा रिपोर्ट पोलिसांना देतो. त्यानंतर सीआयडीकडून चौकशी होते, असे डाॅ. डांगे व्हिडिओत म्हणतात. व्हिडिओत डाॅ. डांगे यांनी खासगी रुग्णालयांवरही निशाणा साधला. खासगी रुग्णालयांचे एजंट घाटी, शासकीय दंत महाविद्यालयात रुग्णांच्या शोधार्थ फिरतात. अशा लोकांवर वाॅच ठेवला जात आहे. एका रुग्णालयाने रुग्णाच्या उपचारासाठी दहा लाख रुपये सांगितले. तो रुग्ण आपल्याकडे आला. घाटी म्हणजे मरण, असे नाही. नाममात्र दरात उपचार येथे होतात, असेही या डाॅ. डांगे म्हणतात.

विहित कार्यपद्धतीएनपीए घेऊनही खाजगीत प्रॅक्टिस करणाऱ्या डाॅक्टरांविषयी विहित कार्यपद्धतीनुसार पोलिसांना माहिती दिली जाते. अशा डाॅक्टरांची सीआयडीमार्फत चौकशी होते आणि रिपोर्ट मागविला जातो. त्यात तथ्य असेल तर शासनाला कळविले जाते. यापूर्वी शासकीय दंत महाविद्यालयातील काही डाॅक्टरांची नावे दिली होती.- डाॅ. एस. पी. डांगे, अधिष्ठाता, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय

टॅग्स :govermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटीAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी