वाळूज महानगर : छत्रपतीनगरालगत साचलेल्या ड्रेनेज व सांडपाण्याची पहाणी करण्यासाठी आलेल्या सिडको अभियंत्याला महिलांनी मंगळवारी घेराव घालून याचा जाब विचारला. दरम्यान, साचलेले ड्रेनेज व सांडपाणी झिरपून बोअरवेलच्या पाण्यात मिसळत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
सिडको प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी न घेताच ड्रेनेजलाईनचे काम सुरु केले होते. नुकताच केलेला सिमेंट रस्ता तोडून हे काम होत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने हे काम अडविले आहे. ड्रेनेजलाईनचे काम रखडल्याने सिडकोच्या सोसायटीचे ड्रेनेज व सांडपाणी छत्रपतनीगरमध्ये साचत आहे. त्यामुळे रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मंगळवारी दुपारी सिडकोचे अभियंता दिपक हिवाळे हे पथकासह ड्रेनेज व सांडपाण्याच्या पाहणीसाठी आले असता त्यांना महिलांनी घेराव घातला.