संतोष हिरेमठ/छत्रपती संभाजीनगर : सिडको -हडको सर्वपक्षीय गणेश महासंघाचे पदाधिकारी उशिरा आल्याचा माईकमध्ये उल्लेख करण्यात आला. यावरून उद्धवसेनेचे शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी, तसेच राजू खरे आणि भाजपचे माजी नगरसेवक शिवाजी दांडगे शाब्दिक वाद उफाळला. हा वाद धक्काबुक्कीपर्यंत गेला. या सगळ्यावरून गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी संताप व्यक्त करीत परत जाण्याची भूमिका घेतील.
आविष्कार कॉलनी चौकात सिडको -हडको सर्वपक्षीय गणेश महासंघाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीच्या उद्घाटन सोहळ्याला सायंकाळी ५ वाजता सुरुवात झाली. त्यापूर्वी अतुल सावे , विश्वनाथ स्वामी, राजू खरे आदी दाखल झाले. परंतु महासंघाचे पदाधिकारी नव्हते. पदाधिकारी उशीराने दाखल झाले. विश्वनाथ स्वामी यांनी माईकमधून याविषयी नाराजी व्यक्त केली. माईकमधून नाराजी व्यक्त करण्यावर शिवाजी दांडगे यांनी आक्षेप घेतला आणि त्यावरून वाद उफाळला. धक्काबुक्कीचा प्रकार झाला.