औरंगाबाद : सिडकोतील वसंतराव नाईक चौक, रेल्वेस्टेशन रोडवरील महावीर चौक, मोंढानाका उड्डाणपुलांचे युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण झाले. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री रामदास कदम यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. पंतप्रधान, मुख्यमंत्री या पदावरील व्यक्ती कुठल्याही एका पक्षाची नसते. त्या पदावर असलेली व्यक्ती सर्वपक्षीय असते. त्यामुळे विकासासाठी सर्व पक्षांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली. भाजपने एकत्रितपणे काम करावे काय, यावर (पान २ वर)रस्ते विकास महामंडळाने कार्यक्रमाचे केलेले नियोजन ऐनवेळी आलेल्या रिमझिम पावसामुळे कोलमडले. तसेच पुण्याच्या सूत्रसंचालिकेला मराठीत बोलता येत नव्हते. त्यामुळे कार्यकर्त्यांनीही गदारोळ करण्यास सुरुवात केली. ४पाऊस सुरू झाल्यामुळे साऊंड बॉक्सवरील ताडपत्री उपस्थितांनी पांघरली. व्यासपीठ छोटे आणि नेते व कार्यकर्त्यांची गर्दी झाल्यामुळे पाऊण तासात कार्यक्रम आटोपता घ्यावा लागला. कार्यकारी अभियंता विक्रम जाधव यांना सूत्रसंचालन करावे लागले. सिडको चौकातील उड्डाणपुलाच्या लोकार्पण कार्यक्रमप्रसंगी भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे यांची गैरहजेरी होती. खा.दानवे हे कार्यक्रमाला का आले नाहीत, याची माहिती घेतली असता समजले की, प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीनंतर ते मुंबईला आले. तेथून ते तातडीने एका बैठकीसाठी दिल्लीला गेले. त्यामुळे ते पुलाच्या लोकार्पण कार्यक्रमप्रसंगी येऊ शकले नाहीत.
सिडको, महावीर चौक उड्डाणपुलांचे लोकार्पण
By admin | Published: June 21, 2016 1:07 AM