वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगरातील सिडको उद्यानाजवळ वॉल्व्हला मंगळवारी गळती लागून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेले. संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
या परिसरात पाणी पुरवठा करणाºया सिडकोच्या जलवाहिनीला वारंवार गळती लागत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे. नागरिकांनी तक्रार केल्यास सिडकोचे कर्मचारी जलवाहिनीची दुरुस्ती करुन गळती थांबवितात. मात्र, काही दिवसांत नागरिक व व्यवसायिक जलवाहिनीला छिद्रे पाडत असल्यामुळे पाण्याची गळती कायम सुरु असते. सिडको उद्यानालगत असलेल्या जलवाहिनीचा वॉल्व्ह मंगळवारी सकाळी नादुरुस्त होऊन गळती लागली. या गळतीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाहुन रस्त्यावर गेले. सिडको प्रशासनाने जलवाहिनी फोडणाºयाविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.