शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या पुढाऱ्यांचा राग माझ्यावर काढू नका"; अजित पवार ग्रामस्थांशी काय बोलले?
2
शरद पवार गटाचे उमेदवार समजीत घाटगे अंतरवालीत; मनोज जरांगेंची घेतली भेट, २ तास चर्चा
3
शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते काँग्रेसच्या प्रचारात; भाजपच्या बंडखोर महिला नेत्याचा मोठा दावा
4
महायुतीत बंडखोरांचा ३६ चा आकडा, त्यापैकी १९ भाजपाचे; बंड शमले नाहीतर युती-आघाडीला ५० जागांवर फटका
5
धनंजय मुंडे यांच्या २०१९ च्या शपथपत्रात तीन, तर २०२४ मध्ये पाच अपत्यांचा उल्लेख!
6
'इमर्जन्सी' ही प्रोपोगंडा फिल्म आहे का? श्रेयसने विचारलेला कंगनाला प्रश्न! अभिनेत्री म्हणाली-
7
"तू तो गया"! सिली पॉइंटवर Sarfaraz Khan चं रचिन विरुद्ध 'स्लेजिंग'; व्हिडिओ व्हायरल
8
८ नोव्हेंबरपासून 'या' कंपनीचा IPO खुला होणार; प्राईज बँड ₹२४, परदेशात आहेत कंपनीचे ग्राहक
9
“मनोज जरांगेंच्या रुपात देशाला आधुनिक गांधी, आंबेडकर, मौलाना आझाद मिळाले”; कुणी केले कौतुक?
10
कर्नाटक आर्थिक संकटात! जेवढी द्यायची ऐपत, तेवढीच आश्वासने द्या...; खर्गेंनी महाराष्ट्रावरून नेत्यांचे कान टोचले
11
नेत्रदिपक भरारी! मेडिकलचं करिअर सोडलं, काहीतरी मोठं करायचं ठरवलं; झाली अधिकारी
12
"मी ठासून सांगतोय माघार घेणार नाही"; वर्षा बंगल्यावरील भेटीनंतर सरवणकरांची स्पष्ट भूमिका
13
Maharashtra Election 2024: महाविकास आघाडीचा गेम बिघडवणार?; ११ बंडखोर कोण आहेत?
14
अमिषा पटेलनं का नाकारला होता शाहरुख खानचा 'चलते चलते'?, अभिनेत्री म्हणाली - "मला..."
15
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या अध्यक्षांचे निधन; मोदींकडून शोक व्यक्त
16
तरुणीचा व्हिडीओ कॉल उचलला आणि हनिट्रॅपमध्ये अडकले मंत्री, त्यानंतर घडलं असं काही...
17
Video - "RC, ड्रायव्हिंग लायसन्सची गरज नाही, पकडलं तर फक्त भाजपाची डायरी दाखवा, पोलीस..."
18
Gautam Adani News : अदानींनी नेमकं केलंय तरी काय? 'या' कंपनीच्या मागे का लागल्यात PNB, ICICI सारख्या बँका?
19
'सुंदर' चेंडू अन् 'कॉपी पेस्ट फॉर्म्युला'! टॉम लॅथमसह रचिन झाला क्लीन बोल्ड (VIDEO)
20
कार्तिक आर्यन-विद्या बालनचा 'भूल भूलैय्या ३' कसा आहे? पहिला Review आला समोर

नागरिकांना पचनी पडेना ‘सिटीजन कनेक्ट’ ॲप; वर्षभरात अवघ्या ३९६ जणांचा वापर

By विजय सरवदे | Published: September 15, 2023 7:09 PM

‘महा-ई-ग्राम सिटीजन कनेक्ट’ हे ॲप कार्यान्वित होऊन आता वर्षभराचा कालावधी होत आला आहे

छत्रपती संभाजीनगर : बदलत्या काळानुसार आता ग्रामपंचायतींचा कारभारही हायटेक झाला आहे. नागरिकांना मोबाइलच्या माध्यमातून घरबसल्या आपल्या मिळकतींना लागणारा कर, पाणीपट्टी भरता यावी, विविध प्रकारचे दाखले काढता यावेत, यासाठी ‘महा-ई-ग्राम सिटीजन कनेक्ट’ हे ॲप कार्यान्वित होऊन आता वर्षभराचा कालावधी होत आला आहे; पण जिल्ह्यातील नागरिकांना हे ‘ॲप’ फारसे पचनी पडलेले दिसत नाही. जिल्ह्यात ८६७ ग्रामपंचायती आहेत. यांपैकी अवघ्या २४ हजार ४८० नागरिकांनीच ‘महा-ई-ग्राम सिटीजन कनेक्ट’ ॲप आपल्या मोबाइलवर डाउनलोड करून घेतले असून, या ॲपच्या माध्यमातून केवळ ३९६ नागरिकांपैकी काहींनी कर भरला, तर काहींनी दाखले काढण्याचा व्यवहार केला असल्याची माहिती समोर आली आहे.

दैनंदिन कामाच्या धबडग्यात करभरणा किंवा आवश्यक दाखले काढण्यासाठी अनेकांना तेवढा वेळ नाही. हे लक्षात घेऊन शासनाने ग्रामपंचायतीचा करभरणा व दाखले काढण्यासाठी या ॲपच्या माध्यमातून ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिल्या. विशेष म्हणजे, आता जिल्हा पंचायत विभागाने घरपट्टी आणि पाणीपट्टी भरण्यासाठी ‘क्यूआर कोड’चीही व्यवस्था केली आहे. ‘क्यूआर कोड’मुळे आर्थिक व्यवहार करणे अधिक सोपे झाले आहे. तरीही या तंत्रज्ञानाला नागरिकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वसुलीच्या आकडेवारीवरून दिसून येते.

मालमत्ता कराची वसुलीजिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडे मालमत्ता कराची मार्च २०२३ पूर्वीची थकबाकी ३ कोटी ८२ लाख ३२ हजार एवढी असून, चालू आर्थिक वर्षातील मागणी ४३ कोटी ४२ लाख २६ हजार रुपये, असे मिळून एकूण ४७ कोटी २४ लाख ५८ हजार रुपये नागरिकांकडून वसूल करण्याचे उद्दिष्ट आहे. मात्र, जुलै अखेरपर्यंत ५ कोटी २६ लाख ५ हजार रुपये अर्थात ११.१३ टक्के वसुली पूर्ण होऊ शकली.

पाणीपट्टीची तीन कोटींची वसुलीग्रामीण नागरिकांना नळ व हातपंपाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यानुसार ग्रामपंचायतींना वीज आणि देखभाल-दुरुस्तीवर खर्च करावा लागतो. त्यामुळे झालेला हा खर्च पाणीपट्टीच्या माध्यमातून वसूल केला जातो. मागील वर्षाची पाणीपट्टीची थकबाकी १ कोटी ५९ लाख १५ हजार रुपये असून, चालू आर्थिक वर्षातील मागणी १७ कोटी २० लाख रुपये आहे. तथापि, एकूण १८ कोटी ७९ लाख १५ हजार रुपये पाणीपट्टी वसुलीसाठी ग्रामपंचायतींकडून प्रयत्न सुरू असून, जुलैअखेरपर्यंत ३ कोटी ५ लाख ९२ हजार रुपये एवढीच वसुली पूर्ण झाली आहे. वसुलीची ही टक्केवारी १६.२८ टक्के एवढी आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMobileमोबाइलgram panchayatग्राम पंचायत