शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
3
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
4
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
5
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
6
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
7
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
8
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
9
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
10
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
11
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
12
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
13
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
14
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
15
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

शहराची पत मनपा पदाधिकाऱ्यांनी घालवली; स्वच्छ भारत अभियानात शहराचा क्रमांक घसरल्याने नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2019 5:35 PM

कचराकोंडी फोडण्यास महानगरपालिकेतील पदाधिकारी, कचरा व्यवस्थापन करणारे अधिकारी, महापौर आणि आयुक्त हे सर्वाधिक जबाबदार असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे.

ठळक मुद्देलोकमतच्या सर्वेक्षणात नागरिकांचे मतआयुक्तांनी दबावाखाली न येता धाडसी निर्णय घ्यावेत, अशी सूचनाही केली

औरंगाबाद : स्वच्छ भारत अभियानात शहराचा क्रमांक १२८ वरून २२० वर घसरल्याने शहरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. शहराची पत घालविण्यास मनपाचे सर्व पदाधिकारी जबाबदार असल्याच्या भावना नागरिकांनी लोकमतने घेतलेल्या आॅनलाईन सर्वेक्षणात व्यक्त केल्या. शहराची पत गेलीच, शिवाय कचराकोंडी फोडण्यास महानगरपालिकेतील पदाधिकारी, कचरा व्यवस्थापन करणारे अधिकारी, महापौर आणि आयुक्त हे सर्वाधिक जबाबदार असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे.

देशपातळीवरील स्वच्छ भारत अभियानात शहराच्या कामगिरीचे मूल्यांकन नुकतेच जाहीर करण्यात आले. यात शहराचा क्रमांक १२८ वरून २२० वर घसरला आहे. यामुळे नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी लोकमतने तात्काळ आॅनलाईन सर्वेक्षण घेतले. सर्वेक्षणात तीन प्रश्न विचारण्यात आले. यात २० ते ७५ वयोगटातील नागरिकांनी सहभाग घेतला. क्रमवारीत घसरण झाल्याने शहराची पत गेली आहे का, या प्रश्नावर संताप व्यक्त करीत ९५.१ टक्के नागरिकांनी होय, असे मत नोंदवले. केवळ ४.९ टक्के नागरिकांनी यामुळे शहराची पत गेली नसल्याचे म्हटले आहे. 

शहराची कचराकोंडी फुटत नाही, यास जबाबदार कोण, या प्रश्नावर ३४.१ टक्के नागरिकांनी मनपाच्या सर्व पदाधिकाऱ्यांस जबाबदार धरले आहे. २२ टक्के नागरिकांनी घन कचरा निर्मूलनाची जबाबदारी असणाऱ्या अधिकाऱ्यांस जबाबदार धरले, १७. १ टक्के नागरिकांनी महापौर, तर १२.२ टक्के नागरिकांनी मनपा आयुक्त जबाबदार असल्याचे मत नोंदवले. ९.८ टक्के नागरिकांनी नगरसेवक, तर ४.९ टक्के नागरिकांनी यास शहरवासीय स्वत: जबाबदार असल्याचे म्हटले आहे. 

यासोबतच कचराकोंडी फोडण्यात आमदार, खासदार आणि सरकारचे दुर्लक्ष झाले आहे का? या प्रश्नावर तब्बल ९२.७ टक्के नागरिकांनी लोकप्रतिनिधींचे कचराकोंडी फोडण्यात साफ दुर्लक्ष झाले असल्याचे म्हटले आहे. २.४ टक्के नागरिकांनी नाही, २.४ टक्के नागरिकांनी काही प्रमाणात आणि २.५ टक्के नागरिकांनी सांगता येत नाही, अशी मते नोंदवली आहेत. 

बेजबाबदार कारभारामुळे लाज गेली महापालिकेच्या बेजबाबदारपणामुळे शहराची लाज गेली आहे, कचराकोंडीमुळे शहर सोडून जावे वाटते, किमान याची जबाबदारी घेऊन सर्वांनी राजीनामे तरी द्यावेत, अशी परखड मते शहराची क्रमवारीत घसरण झाल्याने नागरिकांनी या सर्वेक्षणातून नोंदवली आहेत.

नागरिक म्हणतात : - महानगपालिकेच्या बेजबाबदारपणामुळे ऐतिहासिक शहराची लाज गेली.- आयुक्तांनी दबाव न घेता धाडसी निर्णय घ्यावेत.- महापालिकेत सर्वात वाईट राजकारणी आहेत त्यांना बदला. - महापालिका अधिकाऱ्यांनी काम वाढवायला हवे, राजकारण्यांनी हस्तक्षेप करू नये. - महापालिका आयुक्त आणि अधिकारी आपले कर्तव्य योग्यरीत्या पार पाडत नाहीत. - लोकप्रतिनिधी स्वत:ची पोळी भाजत आहेत, त्यांना जनता माफ करणार नाही. - नगरसेवक काहीच काम करीत नाहीत. - प्रसंगाची कुणालाही काळजी नाही. ‘चलता है’ ही प्रवृत्ती.- राजकारणी, महापालिका प्रशासन आणि सरकार जबाबदार. - खूपच लज्जास्पद बाब आहे. - नागरिकांनी शहरातील सर्व लोकप्रतिनिधी आणि आयुक्त यांच्या घरावर मोर्चा काढावा.- लोकप्रतिनिधींनी राजीनामे द्यावेत.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान