शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

मनपात नागरिक कमी दलाल जास्त येतात; त्यामुळे मी मुख्यालयात सहसा बसत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 7:19 PM

काही नागरिक मनपात येऊ शकत नाहीत. त्यामुळे मी स्वत: त्यांना भेटण्यासाठी जातो, असे मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना नमूद केले.

औरंगाबाद : महापालिकेत सर्वसामान्य नागरिक समस्या घेऊन कमी येतात. दलालांचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे मी मुख्यालयात सहसा बसत नाही. काही नागरिक मनपात येऊ शकत नाहीत. त्यामुळे मी स्वत: त्यांना भेटण्यासाठी जातो, असे मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना नमूद केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात बसून कचरा प्रश्न, समांतर, स्मार्ट सिटी आदी असंख्य प्रश्न हाताळण्यात वेळ गेला. यापुढे मी मुख्यालयातच जास्त वेळ बसण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

महापालिका आयुक्त कार्यालयात थांबत नसल्याची नगरसेवकांसह सर्वसामान्यांचीही तक्रार आहे. नगरसेवक कैलास गायकवाड यांनी तर आयुक्त दाखवा, एक हजार रुपये मिळवा, अशी बक्षीस योजना जाहीर केली होती. असे का होत आहे, असा थेट प्रश्न आयुक्त डॉ. निपुण यांना विचारण्यात आला. आयुक्त म्हणाले की, नगरसेवक गायकवाड यांनी जाहीर केलेले बक्षीस दिले का? असा उलट प्रश्न आयुक्तांनी केला. महापालिकेत येणाºया नागरिकांची संख्या ठराविक आहे. त्यात काही दलालही असतात. त्यांचा वैयक्तिक स्वार्थ असतो. नागरिकांनी मला भेटण्याऐवजी मी त्यांच्यात जाऊन चर्चा करतो. गेल्या काही दिवसांपासून कचरा, पाणी प्रश्न सोडविण्याच्या कामात व्यस्त होतो. 

उधळपट्टी थांबवावी लागेलमहापालिकेचा खर्च आणि उत्पन्न यात मोठी दरी निर्माण झाली आहे. त्यासाठी मालमत्ता कर, नगररचना, मालमत्ता विभाग अधिक सक्षम करण्याची गरज आहे. अनावश्यक खर्च थांबवावा लागेल. त्यासाठी काही कठोर निर्णयही वेळप्रसंगी घ्यावे लागतील. लेखा विभागाला दायित्व, त्यामध्ये सुरू असलेली कामे, झालेली कामे असे वर्गीकरण करून अहवाल देण्यास सांगितले असल्याचे डॉ. निपुण विनायक यांनी नमूद केले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाfundsनिधीGarbage Disposal Issueकचरा प्रश्न