लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : उन्नाव आणि कठुआसह येथील घटनांच्या विरोधात तसेच देशातील बलात्काराच्या घटनांचा निषेध करण्यासाठी शहरातील विविध पक्ष संघटना तसेच तरुणाई सोमवारी रस्त्यावर उतरली. वाळूज महानगरासह औरंगाबाद शहरात सलग दुसºया दिवशीही कँडल मार्च काढून नागरिकांनी आपला असंतोष व्यक्त केला.युवा हिंदू-मुस्लिम एकता मंचयुवा हिंदू-मुस्लिम एकता मंचतर्फे सोमवारी रात्री पैठणगेट ते शहागंजपर्यंत भव्य कँडल मार्चचे आयोजन करण्यात आले होते. या कँडल मार्चला औरंगाबादकरांनी विशेषत: तरुणाईने उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. जम्मू-काश्मीरच्या कठुआ येथे आठ वर्षीय चिमुकलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करण्यात आला. नराधम आरोपी एवढ्यावरच न थांबता तिची दगडाने ठेचून हत्या केली. न्याय मिळावा म्हणून पैठणगेट येथे शेकडो नागरिकांनी पुढाकार घेऊन मेनबत्त्या लावल्या.युवा हिंदू-मुस्लिम एकता मंचचे अध्यक्ष नासेर खान यांनी कँडल मार्चचे आयोजन केले होते. मागील दोन ते तीन दिवसांपासून देशभरात हत्येचा निषेध नोंदविण्यात येत असून, यात तरुणाई मोठ्या संख्येने सहभागी होत आहे. औरंगाबादेतही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. सोमवारी रात्री ७ वाजेपासूनच पैठणगेटवर तरुणाईने अलोट गर्दी केली होती. यावेळी आ. इम्तियाज जलील, राष्टÑवादीचे ज्येष्ठ नेते कमाल फारुकी, माजी महापौर मनमोहनसिंग ओबेरॉय, विनोद पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रकरणामुळे सर्वत्र आक्रोशाची लाट पसरली असून, वेगवेगळ्या समाजातील नागरिक, महिला असिफाला न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर येत आहेत. प्रत्येकाची एकच मागणी आहे, नराधम आरोपींना फाशीची शिक्षा द्या. जलदगती न्यायालयात हे प्रकरण चालवा. काहीही करा मारेक-यांना शिक्षा द्या, असा सूर उमटत आहे.पैठणगेट येथून भव्य कँडल मार्च टिळकपथ, गुलमंडी, सिटीचौकमार्गे शहागंज येथे पोहोचला. येथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर मेनबत्त्या लावून मार्चचा समारोप करण्यात आला. या कँडल मार्चमध्ये सर्व घटकांतील नागरिकांनी सहभाग नोंदविला. याप्रसंगी काँग्रेसचे नेता शेख युसूफ, माजी विरोधी पक्षनेता डॉ. जफर खान, मतीन अहेमद, शेख अथर, अनिस पटेल, आकेफ रझवी, रवींद्र काळे पाटील, अप्पा कुढेकर, शुभम सोनवणे, हमद चाऊस, बाबा बिल्डर, स्वप्नील खेडकर, कृष्णा वाडेकर, राहुल सावंत, युवा हिंदू-मुस्लिम एकता मंचचे अध्यक्ष नासेर खान, नीलेश शिंदे, मसरून खान, नवीन ओबेरॉय, मुकेश सोनवणे, गौतम माळकरी, मोईन इनामदार, रंगनाथ खेडकर, वसीम अहेमद, अमर बिन हैदरा, अब्दुल्ला बिन हलाबी, इद्रीस नवाब खान, इरफान खान, अन्वर नवाब, नदीम पटेल, फेरोज मुलतानी, अमोल राऊत यांची उपस्थिती होती.वाळूज महानगरात कँडल मार्चवाळूज महानगरातही सायंकाळी उत्स्फूर्तपणे कँडल मार्च काढण्यात आला. यावेळी निदर्शकांनी त्या मुलींना न्याय देण्याची मागणी केली. वडगाव कोल्हाटी येथील तरुणांनी एकत्र येऊन कँडल मार्चचे आयोजन केले. अण्णाभाऊ साठे चौकातून कँडल मार्चला सुरुवात झाली. त्रिमूर्ती चौक मार्गे मोहटादेवी मंदिर येथे कँडल लावून दोन मिनिटे मौन बाळगून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कँडल मार्चमध्ये प्रकाश निकम, विकास गायकवाड, सतीश पवार, राजेश पवार, अनिरुद्ध मिसाळ, मयूर साळे, सचिन प्रधान, सागर शेजवळ, पप्पू राजगुरू, सुनील जोगदंडे, आकाश मगर, प्रशिक पठारे, विकास आव्हाड, रमेश बागुल, अजय जाधव, विशाल रुपेकर, सागर पगारे आदींसह शेकडो तरुण सहभागी झाले होते.वाळूजमध्येही श्रद्धांजलीयेथील जीवनलाल पाटणी प्रवेशद्वारापासून कँडल मार्चला सुरुवात झाली. लांझी चौकातून मुख्य रस्त्याने हा मार्च प्रवेशद्वारापाशी आला. या ठिकाणी निषेध सभा घेण्यात आली. यावेळी नदीम झुंंबरवाला, सरपंच सुभाष तुपे, काकासाहेब चाफे, नंदकुमार राऊत, किशोर मिसाळ आदींनी या घटनेचा निषेध करून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली.निदर्शनेयुसूफ मुकाती मित्रमंडळातर्फे निदर्शने युसूफ मुकाती मित्रमंडळातर्फे आज जुन्या बिग बाजारजवळ जनजागृती अभियानांतर्गत कठुआ व उन्नाव येथील अत्याचाराच्या निषेधार्थ निदर्शने करण्यात आली. यावेळी आरोपींना फाशीपेक्षाही कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. रोटी बँकेचे संस्थापक अध्यक्ष युसूफ मुकाती यांनी जमलेल्या प्रचंड जनसमुदायासमोर आपले विचार मांडले. यावेळी हरविंदरसिंग सलुजा, डॉ. मंजू जिल्ला, डॉ. वज्रपाणी पाटील, नादिरा बाजी, मुमताज बाजी, कैलास जैन, कौसर मुकाती, राबिया बाजी, डॉ. परितोष जैस्वाल, इम्रान कादरी, शेख आमेर, सय्यद अन्वर, वसीम आदींनी या निदर्शनाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.सर्वधर्मीयांचा कँडल मार्च...सर्वधर्मीय व सर्वपक्षीयांचा कँडल मार्च काल रात्री मुकुंदवाडी गावातून मुकुंदवाडी पोलीस ठाण्यापर्यंत काढण्यात आला. कठुआ व उन्नाव प्रकरणातील आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.यात शब्बीर पटेल, रफिक पटेल, अशोक डोळस, राजू शिंदे पाटील, बबन जगताप, हनुमान शिंदे, योगेश वळेकर, भाऊसाहेब भोले, अफसर पठाण, मुजू शेख, शेख नूर, दीपक म्हैसमाळे, आरेफ सय्यद, नूर पठाण, कैसर पठाण, मुसा मौलाना, प्रदीप केदार, ज्ञानेश्वर मुळे, अनिस शेख, सलीम पटेल, अश्फाक पठाण, शफिक शेख, संकेत येवले, गंगाधर लोधे, बाबा खान, नय्युम टेलर, अलीम शेख, रोहित सोनवणे, यासीन शेख, आसिफ शेख, अलवर शेख, चेतन वाघ, मुक्तार पटेल, आनंद डोळस आदींनी यात सहभाग घेतला.
दुसऱ्या दिवशीही नागरिकांकडून संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 1:32 AM