छत्रपती संभाजीनगर : कोणत्याही शहराचा विकास व तेथील नागरिकांची सुबत्ता तपासायची असेल तर आर्थिक कुंडली बघणे महत्त्वाचे आहे. यासंदर्भात जिल्हा अग्रणी बँकेने छत्रपती संभाजीनगरची आर्थिक कुंडली तयार केली आहे. यात जिल्ह्यात आजघडीला सर्व प्रकारच्या ३८ बँका असून, त्यांच्या ५०७ शाखा आहेत. मागील वर्षभरात बँकांच्या ठेवीत ६ हजार ५३२ कोटींची वाढ होऊन ५० हजार कोटींचा आकडा पार केला आहे. बँकेत ठेवी ठेवण्याचा हा उच्चांक ठरला आहे.
कशा वाढत गेल्या ठेवी व कर्जवाटपकिती बँका---- मार्च २०२२-- मार्च २०२३---- मार्च २०२४१) बँकेत ठेवी : ३९ हजार ५४६ कोटी---४३ हजार ९१६ कोटी--- ५० हजार ४४८ कोटी२) कर्जवाटप : २९ हजार ५४६ कोटी--- ३४ हजार ९१६ कोटी--- ४३ हजार ५६१ कोटी
जिल्ह्यात ३८ बँकांच्या ५०७ शाखाबँक संख्या एकूण (शाखा)१) राष्ट्रीयीकृत १२ ----- १९९२) खासगी १५----१०२३) स्माॅल फायनान्स बँक ८---२७४) पेमेंट बँक ०१---२५) महाराष्ट्र ग्रामीण बँक ०१ --- ३९६) डीसीसी बँक ०१--- १३८
बँकेच्या शाखा वाढल्या एटीएमची संख्या घटलीशाखा----मार्च २२---मार्च २३---- मार्च २४बँकेच्या शाखा- ४७२--- ४८८--- ५०७एटीएम-- ६७२--- ६८१--- ६६२
यूपीआयने एटीएमवर परिणामडिजिटल व्यवहार करणाऱ्यांची संख्या दरवर्षी वाढत आहे. ६० टक्केपेक्षा अधिक ग्राहक यूपीआयने पेमेंट करीत आहेत. यामुळे एटीएममधून रक्कम काढणाऱ्यांची संख्या कमालीची घटत आहे. रोखेचे व्यवहार कमी होत असल्याने बँकांसाठी एटीएम म्हणजे पांढरा हत्ती पाळण्यासारखे झाले आहे. म्हणून तर जिल्ह्यात मागील वर्षभरात १९ एटीएमला कुलूप लावण्यात आले.
राष्ट्रीयीकृत बँकांवर भरवसा वाढलामध्यंतरी काही पतसंस्थांमध्ये घोटाळे झाले. यापासून धडा घेत ग्राहकांनी राष्ट्रीयीकृत बँकांवर भरवसा दाखविला. परिणामी आजघडीला जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांच्या एकूण ठेवी ३० हजार २६८ कोटींवर जाऊन पोहोचल्या. खासगी बँकेच्या एकूण ठेवी १४ हजार ६२ कोटींवर गेल्या आहेत.
बँकांच्या शाखा वाढीला मोठा वावग्रामीण भागातून अर्ध शहरी व शहरी भागात नागरिकांचे स्थलांतर वाढत आहे. शहरालगतच्या ५० किमी अंतरावर पायाभूत सुविधा निर्माण होत आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ७७०० लोकसंख्येमागे एक बँक आहे. यामुळे बँकांना आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी मोठी संधी आहे. त्यादृष्टीने बँकांची शाखा वाढत आहे. काही बँकांनी शाखा विस्तारासाठी प्रस्ताव पाठविले आहेत.-मंगेश केदार, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक