शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेश दौऱ्यावर जाण्यापूर्वी राष्ट्रपतींचा मोठा निर्णय; जम्मू काश्मीरच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा मार्ग मोकळा केला
2
हिजबुल्लाहचा इस्रायलवर भीषण ड्रोन हल्ला; चार सैनिकांचा मृत्यू, ६० हून गंभीर जखमी
3
बिश्नोई गँगने स्वीकारली बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी? फेसबुक पोस्ट व्हायरल; आरोपी म्हणाला- 'मै १७ साल का...'
4
आजचे राशीभविष्य: ७ राशींना अनुकूल, धनलाभ योग; नोकरीत शुभवार्ता, प्रसन्नतेचा दिवस
5
महाविकास आघाडीने केला ‘गद्दारांचा पंचनामा’; संयुक्त पत्रकार परिषदेतून महायुती सरकारवर निशाणा
6
कोजागरी नवान्न पौर्णिमा: ५ राशींना अनुकूल, नोकरी-व्यापारात यश; इच्छापूर्ती, सुख-सौभाग्य काळ!
7
सणासुदीत प्रशासनाचे हात केळी खायला जातात?
8
तुरुंगातून बाहेर येताच आखला बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट; मुंबई, पुण्यात राहून रेकी, अडीच ते तीन लाखांची सुपारी
9
गुरुचरित्र आपल्याला नेमके काय शिकवते? ११ गोष्टी कालातीत, आजही येते प्रचिती; पाहा, गुरुपदेश
10
निवडणूक आचारसंहिता कधी लागू होणार? वेगवेगळ्या दाव्यांमुळे उत्सुकता वाढली; आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक
11
‘सीएम’पदासाठी कोण? हे आधी महायुतीने सांगावे! मविआच्या नेत्यांचे सूर जुळले; आधीच्या चर्चांना पूर्णविराम
12
काँग्रेस नेते आज दिल्ली दरबारी; आढावा घेणार
13
धानाला हेक्टरी २५ हजार रुपये बोनस देणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही 
14
लाडक्या बहिणींची गर्दी पाहून ‘त्यांच्या’ छातीत धडकी : मुख्यमंत्री
15
"उद्धव ठाकरे इतिहासातून बाहेरच येत नाहीत", राज ठाकरे यांचा निषाणा; ‘पुष्पा’ असा उल्लेख करत मुख्यमंत्र्यांवरही टीका
16
CM शिंदेंनी शिवसेनेचा पहिला उमेदवार केला जाहीर, जयस्वालांना 'या' मतदारसंघातून तिकीट
17
Shubham Lonkar: अकोल्याचा शुभम वर्षभरापासून लॉरेन्स टोळीच्या संपर्कात
18
पुण्यात काँग्रेसमध्ये तिकिटासाठी गर्दी! २१ विधानसभा मतदारसंघासाठी झाल्या मुलाखती
19
छातीत कळ आली अन्...; नांदेडमध्ये 'लाडकी बहीण' कार्यक्रमाला आलेल्या महिलेचा मृत्यू
20
मोठी बातमी! बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणात पुण्यातून एकाला अटक, आरोपी कोण?

नागरिकांनो, मोबाइल सांभाळा; तीन महिन्यांत लुटीचा रेकॉर्ड ब्रेक, तरी पोलिसांना चोर सापडेना

By सुमित डोळे | Published: November 10, 2023 6:33 PM

९७ मोबाइल लुटीच्या घटना, तर ७०० पेक्षा अधिक गहाळ झाल्याची नोंद; तरी पोलिसांना चोर सापडेना

छत्रपती संभाजीनगर : मंगळसूत्र चोरीसह पायी जाणाऱ्या नागरिकांचे कॉलवर बोलताना, हातातील मोबाइल हिसकावून नेण्याच्या घटना अद्यापही थांबलेल्या नाही. ट्रिपल सीट दुचाकीस्वारांच्या टोळ्याच यात सक्रिय झाल्या आहेत. ७ नोव्हेंबर रोजी पुन्हा एसएससी बोर्डासमोर अवघ्या १० मिनिटांमध्ये एका रांगेत दुचाकीस्वार चोरांनी तिघांना याच पद्धतीने लूटले. रात्री १० ते १०:१५ दरम्यान पदमपुरा ते एसएससी बोर्डादरम्यान या घटना घडल्या. गेल्या ९० दिवसांमध्ये ९७ मोबाइल लुटले गेले, तरी पोलिसांना यातील चोर सापडले नाहीत.

पदमपुऱ्यातील व्यावसायिक ललित बन्सवाल (३३) हे ७ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजता एसएससी बोर्ड ते रेल्वेस्थानक रस्त्याने पायी जात होते. अग्निशमन विभागाच्या कार्यालयासमोरून जात असताना काळ्या रंगाच्या हिरो एचएफ डिलक्स दुचाकीवरून आलेल्या ट्रिपल सीट चोरांनी त्यांच्याजवळ जात वेग कमी केला व हातातील मोबाइल हिसकावून नेला. अशाच प्रकारे पुढे काही अंतरावर रोहित औटी (१९), अजय राऊत (२३) यांचाही मोबाइल हिसकावून नेले. घटनेनंतर तिघांनी वेदांतनगर पोलिस ठाण्यात धाव घेतली. बुधवारी दुपारी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

गेल्या तीन महिन्यांमध्ये मोबाइल हिसकावून नेलेल्या ९७ घटनांची नोंद आहे. तर ७४४ मोबाइल गहाळ झाल्याची नोंद आहे. यातील जवळपास ७० टक्के मोबाइल चोरी, लूटले गेलेलेच असतात. मात्र, ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल करण्याचे टाळून गहाळ झाल्याची नोंद केली जाते. त्यामुळे असे एकूण ९००च्या आसपास मोबाइल अवघ्या ९० दिवसांत लूटले गेले आहेत.

एक चोर सापडला, तोही नागरिकामुळे२ नोव्हेंबर राेजी बजाज रुग्णालयासमोर रुग्णाच्या नातेवाइकाचा ट्रिपल सीट दुचाकीस्वारांनीच मोबाइल हिसकावून नेला. मात्र, तानाजी चव्हाण यांनी पाठलाग करून तिघांपैकी सुशांत भालेराव (रा. सिंधीबन) याला पकडले. उर्वरित एकाही घटनेत स्थानिक पोलिस, गुन्हे शाखेला या टोळ्या पकडता आलेल्या नाही. बहुतांश घटना कॅनॉट प्लेस, चिकलठाणा औद्योगिक वसाहत, एन-१, एन-४, क्रांतीचौक, उस्मानपुरा, सातारा, वाळूज औद्योगिक वसाहतीत घडल्या आहेत. विशेष म्हणजे, सर्व घटनांमध्ये चोर ट्रिपल सीट असतात. मोपेड दुचाकीचा सर्वाधिक वापर होतो. त्यामुळे रस्त्याने पायी जाताना कॉलवर बोलणे, हातात मोबाइल ठेवणेही शहरात नागरिकांसाठी मनस्ताप देणारे ठरत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद