शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
3
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
4
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
5
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
6
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
7
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
8
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
9
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
10
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
11
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
12
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
13
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
14
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
15
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
16
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
17
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
18
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
19
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
20
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप

शहर पुन्हा अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 11:43 PM

शहरात सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी वादळी वारे व पावसामुळे महावितरणची यंत्रणा कोलमडून वीजपुरवठा खंडित झाला. यामुळे शहराचा अर्धा भाग अंधारात बुडाला. अनेक ठिकाणी झाडे थेट विद्युत वाहिन्यांवर कोसळली. त्यामुळे तारा तुटून अनेक भागांचा वीजपुरवठा खंडित झाला.

ठळक मुद्देवीज यंत्रणेला फटका : वाहिन्यांवर झाडे पडल्याने वीजपुरवठा खंडित

औरंगाबाद : शहरात सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी वादळी वारे व पावसामुळे महावितरणची यंत्रणा कोलमडून वीजपुरवठा खंडित झाला. यामुळे शहराचा अर्धा भाग अंधारात बुडाला. अनेक ठिकाणी झाडे थेट विद्युत वाहिन्यांवर कोसळली. त्यामुळे तारा तुटून अनेक भागांचा वीजपुरवठा खंडित झाला. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करून काही भागांत वीजपुरवठा पूर्ववत केला. मात्र, अनेक भागांत वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत काम सुरू होते.वादळी पावसामुळे साडेचार वाजेच्या सुमारास महावितरणच्या हिमायतबाग उपकेंद्रातून निघणाºया ११ केव्हीच्या सिटीचौक, रोजाबाग, नेहरू भवन व गणेश कॉलनीतील वीजपुरवठा बंद पडला. दुरुस्तीनंतर गणेश कॉलनी वगळता उर्वरित वाहिन्यांवरील वीजपुरवठा सुरळीत झाला. ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर, कटकटगेट व सेव्हन हिल या भागात विद्युत वाहिन्यांवर झाड कोसळल्याने वीजपुरवठा खंडित झाला. तापडिया नाट्य मंदिराजवळ ११ केव्ही वाहिनीवर झाडाची फांदी कोसळल्याने औरंगपुरा, निराला बाजार परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला.पावसामुळे सिडको व चिकलठाणा परिसरातही सायंकाळी दोन तास वीजपुरवठा बंद होता. ३३ केव्हीच्या ३ वाहिन्या बंद पडल्याने गारखेडा परिसर, समर्थनगर, पैठणगेट, रंगमंदिर, उस्मानपुरा, दूध डेअरी परिसरातही चार तास वीज नव्हती. छावणी, भावसिंगपुरा परिसरातही अनेक ठिकाणी वीजपुरवठा पावसामुळे खंडित झाला. जाधववाडी उपकेंद्रातील ब्रेकर नादुरुस्त झाल्यामुळे आरतीनगर, पिसादेवी रोड, श्रीकृष्णनगर, पवननगर, आंबेडकरनगर या भागांचा वीजपुरवठा खंडित झाला.महावितरणच्या अभियंते-कर्मचाºयांनी युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम केले. त्यामुळे अनेक भागांचा वीजपुरवठा सायंकाळपर्यंत पूर्ववत झाला. परंतु अधिक नुकसान असलेल्या ठिकाणी उशिरापर्यंत वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू होते.चौकट...दूरध्वनी ‘नॉट रिचेबल’ नागरिकांना समाधानकारक उत्तरे नाहीवीजपुरवठा खंडित झाल्यानंतर नागरिक महावितरणच्या दूरध्वनींवर संपर्क साधून वीज कधी येणार, अशी विचारणा करीत होते. मात्र, अनेक ठिकाणी दूरध्वनी उचलला जात नव्हता. दूरध्वनी उचलला गेला तर समाधानकारक उत्तरे मिळत नव्हती. त्यामुळे वारंवार संपर्क करण्याची वेळ नागरिकांवर ओढावत होती. त्यामुळे महावितरणच्या कारभाराविषयी नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.-----------

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादmahavitaranमहावितरण