शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब... काय तो स्टॅमिना! धड झोप नाही, खाण्याची वेळ नाही, प्रचारादरम्यान, नेतेमंडळी कोणती काळजी घेतात?
2
थंडीविना केवळ १९ टक्के क्षेत्रावरच रब्बीच्या पेरण्या, ज्वारी ३४ टक्के, हरभरा १७, गव्हाचा केवळ ४ टक्के पेरा पूर्ण
3
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
4
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
5
कॅप्टन सूर्याकडून तो खास मेसेज मिळाला अन् संजू चमकला!
6
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
7
IND vs SA : लांब सिक्सर मारणाऱ्यापेक्षा रस्त्यावर पडलेला मॅच बॉल लांबवणाऱ्याची चर्चा (VIDEO)
8
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
9
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
10
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
11
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
13
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
14
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
15
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
17
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
18
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
19
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
20
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा

नवरात्रोत्सवात शहर बनले गटारगंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 1:04 AM

मोठे सण डोळ्यासमोर असताना शहरातील १४ लाख नागरिकांना त्रासच त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील ११४ वॉर्डांमध्ये ५०० पेक्षा अधिक ठिकाणी ड्रेनेजलाइन चोकअप झाल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : गणेशोत्सवानंतर आता नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. लवकरच दसरा आणि सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी साजरी करण्यात येणार आहे. अनेक मोठे सण डोळ्यासमोर असताना शहरातील १४ लाख नागरिकांना त्रासच त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील ११४ वॉर्डांमध्ये ५०० पेक्षा अधिक ठिकाणी ड्रेनेजलाइन चोकअप झाल्या आहेत. दूषित, दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्याने वाहत आहे. जिकडे तिकडे हे विदारक चित्र पाहायला मिळत आहे. नवरात्रोत्सवात शहरातील हजारो भाविक चप्पलचा वापर करीत नाहीत, त्यांना दुर्गंधीतूनच ये-जा करावी लागत आहे.शहरातील ड्रेनेज व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. महापालिकेच्या वॉर्ड कार्यालयांकडे ड्रेनेज चोकअप काढण्यासाठी हवी तेवढी यंत्रसामुग्री, कर्मचारी नाहीत. अत्यंत तोकड्या कर्मचाºयांवर ड्रेनेज व्यवस्थेचा डोलारा सांभाळावा लागत आहे. प्रत्येक वॉर्ड कार्यालयातील कर्मचारी किमान दोन ते तीन तक्रारींची शहानिशा करतात. प्रत्येक नगरसेवकाच्या वॉर्डात किमान चार ते पाच ठिकाणी ड्रेनेजलाइन चोकअप आहेत. शहरातील प्रमुख रस्त्यांवरही ड्रेनेजचे पाणी वाहत असल्याचे दिसून येते. काही ठिकाणी तर दोन ते तीन महिने झाले तरी महापालिकेचे कर्मचारी दुरुस्तीसाठी येत नाहीत. शहरातील ४० टक्के नागरिक रांगा लावून महापालिकेच्या वॉर्ड कार्यालयांमध्ये मालमत्ता कर भरतात. त्यांनाही नादुरुस्त ड्रेनेज यंत्रणेचा त्रास सहन करावा लागतो. मालमत्ता करात ड्रेनेज करासह भूमिगत गटार योजनेचा सिव्हेज कर नागरिकांकडून वसूल करण्यात येत आहे. दरवर्षी ड्रेनेज आणि सिव्हेज कराच्या माध्यमातून मनपाकडे जेवढी रक्कम जमा होते, तेवढी रक्कमही मनपा दुरुस्तीवर खर्च करीत नाही. शहरातील अनेक वसाहतींमध्ये लोकसंख्येच्या अनुषंगाने ड्रेनेजलाइन टाकल्या होत्या. अनेक वसाहतींमध्ये लोकसंख्या वाढली पण ड्रेनेजलाइन जुन्याच आहेत. त्यामुळे ड्रेनेजलाइन चोकअप होत आहेत.