बीड : शहरात स्वच्छता मोहिमेच्या अनुषंगाने स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत वैयक्तिक तसेच सार्वजनिक शौचालय उभारुन शहर पाणंदमुक्त केले जाणार आहे. त्या अनुषंगाने मंगळवारी महाराष्ट्र स्वच्छ अभियानच्या उपसंचालिका स्मिता झगडे यांनी बैठक घेऊन आढावा घेतला. ३१ मार्चपर्यंत शहर चकाचक होणार आहे.राज्यभरात स्वच्छता अभियान राबविले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहराचा आढावा घेण्यात आला. स्वच्छतेच्या अनुषंगाने प्रभागानुसार शौचालय उभारले जाणार आहेत. शिवाय मोडकळीस आलेल्या शौचालयांची पुनर्बांधणी केली जाणार आहे. स्वच्छता मोहिमेत सहभाग घेऊन शहर हागणदारी मुक्त झाले तरच १४ व्या वित्त आयोगातून स्वच्छतेसाठी निधी मिळणार असल्याचे उपसंचालिका झगडे यांनी बैठकीदरम्यान सांगितले. उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर, सीओ प्रशांत खांडकेकर यांच्यासह नगरसेवकांची उपस्थिती होती. २० मार्चपर्यंत स्वच्छतेचा आढावा सादर करावा लागणार आहे. मोहीम यशस्वीपणे राबविल्यास वर्गवारीनुसार कोट्यवधींचे बक्षीस शहराला मिळणार आहे. (प्रतिनिधी)
३१ मार्चपर्यंत शहर चकाचक...!
By admin | Published: February 21, 2017 10:20 PM