औरंगाबाद : एमजीएम मैदानावर सुरू असलेल्या २८ व्या शहीद भगतसिंह औद्योगिक क्रिकेट स्पर्धेत शहर पोलीस ब, वैद्यकीय प्रतिनिधी क व स्कोडा आॅटो संघांनी प्रतिस्पर्धी संघांवर मात केली. अब्दुल कय्युमचे तडाखेबंद नाबाद शतक हे आजच्या सामन्याचे वैशिष्ट्य ठरले.पहिल्या सामन्यात इंडो जर्मन टूल रूमने ८ बाद १२६ धावा केल्या. त्यांच्याकडून सुशील नाईक (२४), नीलेश नाईक (२0) व दीपक जगताप (१७) यांनी योगदान दिले. स्कोडा आॅटोकडून महेश गरडने २८ धावांत ३, संदीप खोसरेने २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात स्कोडा आॅटोने विजयी लक्ष्य १९.३ षटकांत ८ गडी गमावून गाठले. त्यांच्याकडून संदीप खोसरेने ४ चौकारांसह ३३, विक्की निकुंबेने २0 व पवन कांबळेने १९ धावा केल्या. इंडो जर्मन टूल रूमकडून गौरव शिंदेने २ गडी बाद केले.दुसऱ्या सामन्यात आयुर्विमा संघाने ८ बाद १४१ धावा केल्या. त्यांच्याकडून श्याम लहानेने ३३, संतोष धोटेने २५ धावा केल्या. ‘शहर पोलीस ‘ब’कडून ज्ञानेश्वर वानखरेने २५ धावांत ४ व गजानन आडेने २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात शहर पोलिसने विजयी लक्ष्य १३.३ षटकांत पूर्ण केले. त्यांच्याकडून प्रीतेश चार्ल्सने ६ चौकार व ६ षटकारांसह ७७, पंकज दळवीने ३२ व अजय कावळेने २३ धावा केल्या. आयुर्विमाकडून सुफियान अहमदने २ गडी बाद केले. तिसºया सामन्यात अब्दुल कय्युम याने ६९ चेंडूंत २ षटकांर व १३ चौकारांसह केलेल्या नाबाद १00 धावांच्या बळावर वैद्यकीय प्रतिनिधी संघाने २0 षटकांत १ बाद १७९ धावा केल्या. अब्दुल कय्युमने इम्रान पटेलच्या साथीने ८८ व अमान खान याच्या साथीने दुसºया गड्यासाठी ९१ धावांची भागीदारी केली. अमान खानने नाबाद २४ व इम्रान खानने २ षटकार व ४ चौकारांसह ४२ धावा केल्या. मसिआकडून मंगेश निटूरकरने १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात मसिआ ७४ धावांत गारद झाला. त्यांच्याकडून अतिक नाईकवाडे (१४) व मधुर पटेल (१२) हेच दुहेरी आकडी धावसंख्या गाठू शकले. वैद्यकीय प्रतिनिधी संघाकडून इम्रान पटेलने १२ धावांत ३ व अमान खान, वैभव कोळपे, मोहम्मद मुदस्सर यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. २९ मार्च रोजी सकाळी ७.३0 वा. एमजीएम ब वि. वैद्यकीय प्रतिनिधी ड, ११ वा. मध्यवर्ती कार्यशाळा वि. कम्बाईन बँकर्स ब, दुपारी २ वा. महावितरण वि. जिल्हा वकील अ यांच्यात सामने रंगणार आहेत.
शहर पोलीस, वैद्यकीय प्रतिनिधी संघ विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 12:57 AM
एमजीएम मैदानावर सुरू असलेल्या २८ व्या शहीद भगतसिंह औद्योगिक क्रिकेट स्पर्धेत शहर पोलीस ब, वैद्यकीय प्रतिनिधी क व स्कोडा आॅटो संघांनी प्रतिस्पर्धी संघांवर मात केली. अब्दुल कय्युमचे तडाखेबंद नाबाद शतक हे आजच्या सामन्याचे वैशिष्ट्य ठरले.
ठळक मुद्देऔद्योगिक टष्ट्वेंटी-२0 क्रिकेट स्पर्धा : अब्दुल कय्युमचे तडाखेबंद नाबाद शतक