औरंगाबाद : औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित व्हेरॉक करंडक औद्योगिक ट्विेंटी २० क्रिकेट स्पर्धेत शहर पोलीस ‘अ’ संघाने एमआर इलेव्हन आणि ग्रामीण पोलीसने एमएसईडीसीएलचा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. सकाळच्या सत्रात एमआर इलेव्हनने २० षटकात ९ बाद १०१ धावा केल्या. त्यांच्याकडून इशांत रायने ५ चौकारांसह ३५ धावा केल्या. शहर पोलीसकडून संजय पाटील व मोहंमद इम्रान यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. गिरिजानंद भक्त, असीफ शेख, राहुल जोनवाल व इफ्तेखार शेख यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात शहर पोलीसने विजयी लक्ष्य ११.३ षटकांत बिनबाद १०५ धावा करीत गाठले. त्यांच्याकडून मुकीम शेखने ८ चौकार, २ षटकारांसह नाबाद ५४ व असीफ शेखने ३ षटकार व ३ चौकारांसह नाबाद ४० धावा केल्या.दुसºया उपांत्यपूर्व फेरीत एमएसईडीसीएलने २० षटकांत ७ बाद १२१ धावा केल्या. त्यांच्याकडून इनायत सय्यदने ४५ चेंडूंत ८ चौकार व एका षटकारासह ५१ धावा केल्या. प्रदीप चव्हाणने २० व बाळासाहेब मगरने अनुक्रमे २० व १८ धावा केल्या. ग्रामीण पोलीसकडून संजय सपकाळ, प्रदीप पवार यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. विकास नगरकर, संदीप जाधव व अजय काळे यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात ग्रामीण पोलीसने विजयी लक्ष्य १८.२ षटकांत ४ गडी गमावून गाठले. त्यांच्याकडून विकास नगरकरने ३६ चेंडूंत ७ चौकारांसह नाबाद ५७ व विशाल नरवडेने ३० धावा केल्या. एमएसईडीसीएलकडून सचिन पाटीलने २ गडी बाद केले.
शहर, ग्रामीण पोलीस उपांत्य फेरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 1:17 AM