लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: प्लास्टिकच्या सार्वत्रिक व अनिर्बंध वापरामुळे शहर अस्वच्छतेच्या विळख्यात सापडले आहे़ प्लास्टिकमुळे अनेक जनावरांना आपला जीव गमवावा लागला़ याबाबत नागरिक कृती समितीने मनपा आयुक्तांना निवेदन दिले़ त्यावर आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देत, शहर प्लास्टिकमुक्त करण्याचे आश्वासन दिले़नागरिक कृती समितीने शनिवारी आयुक्त गणेश देशमुख यांची भेट घेऊन विविध समस्यांवर मांडल्या़ त्यात रस्त्यावरील मोकाट जनावरे, स्वच्छता कामगारांची गरज, कामगारांचा पूर्ण क्षमतेने वापर, स्वच्छतेबाबत लोकप्रबोधन व लोकसहभाग आदी विषयांवर शिष्टमंडळाने आयुक्तांशी चर्चा केली़ त्यावर आयुक्तांनी शिष्टमंडळाच्या सर्व मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला़ तसेच शहरातील प्लास्टिकचा वाढता वापर रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले़ एटूझेडने काम बंद केल्यानंतर स्वच्छतेसाठी नवीन कंत्राटदारांची नियुक्ती होईपर्यंत हे काम मनपाकडून करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली़ शिष्टमंडळात डॉ़ व्यंकटेश काब्दे, प्रा़ डॉ़ लक्ष्मण शिंदे, कॉ़ जांबकर, अॅड़ धोंडिबा पवार, डॉ़ पुष्पा कोकीळ, प्रा़ वट्टमवार, टिमकीकर, सूर्यकांत वाणी, प्रा़ सुलोचना मुखेडकर यांचा सहभाग होता़
शहर होणार प्लास्टिकमुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2017 12:15 AM