शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
2
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
3
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
4
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
5
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
6
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
7
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."
8
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढविली, तोच उमेदवार शिंदे गटात जाणार; लता शिंदेंच्या उपस्थितीत घोषणा
9
भारतात ईव्हीएम हवे की, बंद व्हावे? बघा सर्व्हे काय सांगतो?
10
"घरी ऐश्वर्या आराध्याची काळजी घेते म्हणूनच मी...", अभिषेक बच्चनचं वक्तव्य चर्चेत, म्हणाला- "पुरुषांमधला दोष हाच की..."
11
IND vs AUS: पर्थवर इतिहास रचण्यात टीम इंडिया 'यशस्वी'! ऑस्ट्रेलियाच्या बालेकिल्ल्यात 'विराट' विजय
12
आपल्यावर गुरुकृपा आहे किंवा होणार आहे हे कसे ओळखायचे? जाणून घ्या पूर्वसंकेत!
13
८०० जणांविरोधात एआयआर, ड्रोन फुटेजमधून घेतले फोटो, संभलमधील दंगेखोरांवर मोठ्या कारवाईची तयारी
14
Utpanna Ekadashi 2024: निर्मळ मनाने विष्णुभक्ती केली असता त्याचे अनपेक्षित फळ मिळते; कसे ते पहा!
15
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस होणार राज्याचे मुख्यमंत्री?; आजच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता
16
'जानी दुश्मन'चा खेळ खल्लास! बुमराह-विराट यांच्यात दिसला 'मिले सुर मेरा तुम्हारा सीन' (VIDEO)
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ही काय भानगड! ९५ मतदारसंघात मतांमध्ये तफावत; मतदान अन् EVM ची मते कुठे जुळली नाहीत?
18
उत्पत्ति एकादशी: ६ राशींना उन्नती, यश-प्रगतीची संधी; श्रीविष्णूंची कृपादृष्टी, लाभच लाभ!
19
५० खोके एकदम ओके...राज्यात गाजलेली घोषणा पहिल्यांदा देणारा आमदारही निवडणुकीत पराभूत
20
"...तर याचा करेक्ट कार्यक्रम वाजला असता"; रोहित पवारांच्या 'त्या' विधानावर अमोल मिटकरी भडकले

शहराला पाणी कमी पडणार नाही - महापौर

By admin | Published: February 18, 2016 11:36 PM

नांदेड : शहराला पिण्यासाठी पाण्याची कोणतीही कमतरता पडणार नाही, असे महापौर शैलजा स्वामी यांनी स्पष्ट केले आहे़

नांदेड : शहराला पिण्यासाठी पाण्याची कोणतीही कमतरता पडणार नाही, असे महापौर शैलजा स्वामी यांनी स्पष्ट केले आहे़ दिवंगत नेते माजी गृहमंत्री शंकरराव चव्हाण आणि माजी मुख्यमंत्री खा़ अशोकराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीमुळे शहरातील पाण्याचा प्रश्न मिटला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले़महापौर स्वामी यांनी गुरुवारी आसना नदीवरील बंधाऱ्यास भेट दिली़ इसापूर येथून नांदेड शहरासाठी आसना नदीमध्ये पाणी सोडले जाणार आहे़ या बंधाऱ्याच्या मजबुतीकरणाचे काम सध्या सुरू आहे़ या कामाचा स्वामी यांनी आढावा घेतला़ यावेळी उपमहापौर शफी अहमद कुरेशी, सभागृह नेता विरेंद्रसिंघ गाडीवाले, सभापती अनुजा तेहरा, आयुक्त सुशील खोडवेकर, उदय देशमुख, कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे, उपअभियंता आडसुळे आदींची उपस्थिती होती़ विष्णुपूरी प्रकल्पामुळे शहराची तहान आतापर्यंत भागली आहे़ यंदा दुष्काळाची तीव्रता वाढल्याने शहराला इसापूर धरणातून पाणी आणण्याचे काम माजी मुख्यमंत्री खा. चव्हाण आणि आ़ डी़ पी़ सावंत यांच्या माध्यमातून झाले आहे़ त्याचवेळी आता आसना नदीच्या पात्राच्या खोलीकरणाचे कामही महापालिकेने सुरू केले आहे़ या कामामुळे शहराला एक महिना पुरेल इतके पाणी उपलब्ध होणार आहे़ जवळपास १ दलघमी पाणी मिळणार आहे़ त्यामुळे शहरात पिण्याच्या पाण्याची कोणतीही कमतरता भासणार नाही असे महपौरांनी सांगितले़ मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांची परिस्थिती पाहता नांदेड जिल्ह्यात समाधानकारक परिस्थिती असून यासाठी दूरदृष्टीच्या नेत्यांचे कार्य महत्त्वाचे असल्याचे त्या म्हणाल्या़(प्रतिनिधी)