आसडी येथील प्रकाश सोनवणे हे हलाखीच्या परिस्थितीवर मात करीत सैन्यात भरती झाले होते. सेवानिवृत्त होऊन ५ फेब्रुवारी रोजी घरी परतले. आसडीत येताच गावकऱ्यांनी फुलांनी सजलेल्या वाहनातून प्रकाश सोनवणे यांच्यासह त्यांची आई रुखमनबाई, वडील पांडुरंग सोनवणे यांची वाजतगाजत मिरवणूक काढली. यानिमित्ताने भारुडकार निरंजन भाकरे यांच्या समाजप्रबोधन कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. सेवा निवृत्त प्राचार्य नामदेवराव चापे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमात गावातील इतर सेवानिवृत्त सैनिकांचाही सन्मान करण्यात आला. यावेळी भागवत मिरगे, विष्णू मेटे, दादाराव साळवे, संतोष मिरगे, ह.भ.प. अजाबराव मिरगे, विठ्ठल पा. सुरडकर, प्रा. तुपे, बापू सोनवणे, अनिल गावंडे, विठ्ठल मिरगे, विनोद गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती.
फोटो कॅप्शन : आसडी येथे सेवानिवृत्त सैनिक प्रकाश सोनवणे यांची मिरवणूक काढण्यात आली.