परभणी : जिल्ह्यातील तांड्यांचा विकास करण्यासाठी सुरु असलेली जिल्हा तांडावस्ती सुधार योजना दोन वर्षांपासून बंद पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तांड्यांचा विकास ठप्प झाला आहे.तांड्यावरील विकासकामे करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने तांडावस्ती सुधार योजनेची कामे केली जातात. परंतु, आधीच शाळा, रस्ता, रेशन, आधारकार्ड, रॉकेल, पक्की घरे आदींचा अभाव असलेल्या तांड्यावर योजना सुरु झाल्यापासून केवळ एक वेळा लाभ देण्यात आला. जिल्ह्यातील दोन प्रतिष्ठीत नेत्यांच्या कचाट्यात ही योजना सापडली आहे. या नेत्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावून योजनेत हस्तक्षेप केला. त्यामुळे या योजनेचा अध्यक्ष प्रत्येक वेळी बदलत राहिला व नुकसान मात्र समाजाचे होत आहे, असा आरोप गोपीनाथ राठोड यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केला आहे. दरम्यान, १५ दिवसांच्या आत ही योजना सुरु करावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा गोपीनाथ राठोड यांच्यासह शिवराम जाधव, राजेश पवार, अंबादास पवार, एम.एल.जाधव, प्रेमदास राठोड, मोकिंद जाधव, मोहन राठोड, शंकर पवार यांच्यासह अनेकांनी दिला आहे. (प्रतिनिधी)रस्त्यावर खड्डेपरभणी : परभणी ते लोहगाव या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. दुरुस्तीची मागणी होत आहे.
जिल्ह्यातील तांडावस्ती योजना पडली बंद
By admin | Published: August 14, 2014 11:22 PM