शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

वर्गाच्या आडून ‘शाळा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2017 12:32 AM

औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या बहुतांशी शाळांमध्ये पाचवी तसेच आठवीचे वर्ग सुरू करण्यासाठीचे प्रस्ताव शिक्षण विभागाकडे प्राप्त झाले आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या बहुतांशी शाळांमध्ये पाचवी तसेच आठवीचे वर्ग सुरू करण्यासाठीचे प्रस्ताव शिक्षण विभागाकडे प्राप्त झाले आहेत. तथापि, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्षपद टिकून राहावे, यासाठी केलेला हा खटाटोप असल्याचे बिंग आज शिक्षण समितीच्या बैठकीत फुटले. शिक्षण समितीच्या सभापती मीनाताई शेळके यांच्या अध्यक्षतेखाली आज शुक्रवारी बैठक झाली. या बैठकीत शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख, शिक्षण प्राधिकरणाचे संचालक डॉ. सुभाष कांबळे आदींसह गटशिक्षणाधिकारी व सदस्य उपस्थित होते. नैसर्गिक वाढीनुसार जिल्हा परिषद शाळांना वरचे वर्ग सुरू करण्यासाठी परवानगी द्यायला हरकत नाही, अशा चर्चेला बैठकीत सुरुवात झाली. जिल्ह्यात अनेक ठिकाणी इयत्ता पहिली ते चौथी आणि काही ठिकाणी सातवीपर्यंत शाळा आहेत. गावातील शाळेत ज्या व्यक्तीचा पाल्य शिकत आहे, अशा व्यक्तीलाच शालेय व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष होता येते. बहुतांशी ठिकाणी सातवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मुले जवळच्या खाजगी शाळांत प्रवेश घेतात. त्यामुळे पाल्याने शाळा सोडली की संबंधितांस शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्षपदसुद्धा सोडावे लागते. अध्यक्षपद टिकून राहावे, यासाठी बहुतांशी समिती अध्यक्षांनी शाळेला पाचवी तसेच आठवीचे वर्ग नव्याने सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाकडे परवानगी मागितलेली आहे. दरम्यान, शिक्षण सभापती मीनाताई शेळके यांनी या विषयानुसार निर्णय जाहीर केला की, शासन नियमानुसार पाचवीचा वर्ग सुरू करण्यासाठी एक किलोमीटर परिघात दुसरी शाळा नसावी आणि आठवीच्या वर्गासाठी शाळेच्या परिघात तीन किलोमीटर अंतरापर्यंत शाळा नसावी. या नियमाचे पालन करून पात्र प्रस्तावांना नवीन वर्ग सुरू करण्याची परवानगी द्यावी.