- श्यामकुमार पुरे
सिल्लोड: शहरात 30 वर्षांपूर्वी एकाच वर्गात असलेल्या एका मैत्रिणीच्या पतीस कॅन्सरचे निदान झाले. याची माहिती शाळेतील जुन्या मित्रमैत्रीणींना कळताच सर्वांनी मिळून उपचारासाठी आर्थिक मदत उभारत मैत्रिणीला दिलासा दिला. मित्रांनीच सोशल मिडीयावर मदतीसाठी आवाहन केल्यानंतर तब्बल ४१ हजाराची मदत झाली असून ती मैत्रिणीकडे सोपविण्यात आली असता तिच्या डोळ्यात अश्रू तराळले.
शितल राजू सुरासे ( रा. सिल्लोड) असे या नशीबवान मैत्रिणीचे नाव आहे. त्या सिद्धेश्वर हायस्कुल माणिकनगर-भवन- येथे १९८७-१९९६ मध्ये शिक्षण घेत होती. शितलचे पती सिल्लोड येथे प्रिंटीग प्रेसचा व्यवसाय करतात. बऱ्याच दिवसांपासून त्यांना पोट दुखीचा त्रास होता. तपासणीअंती त्यांना कॅन्सर झाल्याचे निदान झाले. जेमतेम परिस्थिती असल्याने कॅन्सरवरील महागडे उपचाराची कल्पना आल्याने सुरासे कुटुंबीय चिंतेत होते. दरम्यान, शीतलच्या शालेय वर्ग मित्रमैत्रिणींना तिच्या पतीच्या आजाराबद्दल कळले असता सर्वांनी तिला आर्थिक मदत करण्याचे ठरवले.
सोशल मिडीयावर राबवले 'मिशन शीतल'अजय खाजेकर याने सोशल मिडीयावर शीतलच्या अडचणीबद्दल माहिती सर्वांना दिली. तसेच तिला आर्थिक मदतीचे आवाहन करत 'मिशन शीतल' असे अभियान राबवले. सर्वांनी यथाशक्ती मदत करत ४१ हजाराची रक्कम गोळा केली. सोमवारी ही मदत सर्वांनी मिळून शीतलकडे सुपूर्द करत राजू सुरासे यांच्या उपचारासाठी दिलासा दिला. सकट काळी धावून येणारे जुने वर्गमित्रमैत्रिणी पाहून शीतल यांच्या डोळ्यात पाणी तरळले.
यांनी केली मदत : #मिशन शितल या उपक्रमात अजय खाजेकर, चंद्रशेखर काळे, अजय साळवे, कल्पना गोंगे-चांद्रे, शिवाजी तुपे, गणेश डकले, आनंदा बडक, संतोष कावले, कडुबा सोनवणे, गजानन कोल्हे, सुनिल सातघरे, संतोष आहेर, महेश राजहंस, संदिप बोराडे, पंकज पळशीकर, अंकुश बडक, अजिनाथ डकले, देविदास बोर्डे, दशरथ तेलंग्रे, अंकुश देवरे, प्रमोद काकडे, पुरुषोत्म तायडे, गणेश तायडे, विलास सिरसाट, गिता अक्कर-तांबट, रंजना गावंडे-घोरपडे, गणेश नागरे, छाया मोरे-फरकाडे, जयश्री परांडे-कावळे, राजु काकडे, संदिप गोराडे, स्वप्ना मादनीकर-पाटील, नितीन बावसकर, रामेश्वर जाधव, अनिता गावंडे-वाघ, अर्चना कळम-जंजाळ, कल्पना साखरे-गायकवाड, इकबाल शेख, नंदा गायकवाड-दसपुते, सविता शिंदे ठोंबरे, केशव जाधव, शितल काळे लांडगे, संगीता तुपे-गायकवाड यांनी मदत केली.