शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

स्वच्छतेत जालना शहर मागेच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2017 12:14 AM

जालना: केंद्रीय नगर विकास मंत्रालयाने देशातील ४३४ शहरांतील स्वच्छतेबाबत स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत जालन्याने ३६८ वा क्रमांक मिळविला.

जालना: केंद्रीय नगर विकास मंत्रालयाने देशातील ४३४ शहरांतील स्वच्छतेबाबत स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत जालन्याने ३६८ वा क्रमांक मिळविला. थोडक्यात जालना लांब फेकले गेल्याने शहरातील स्वच्छतेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. केंद्राच्या नगर विकास विभागाने जानेवारीमध्ये स्वच्छ शहर स्पर्धा घेतली होती. यात अंतर्गत शहरातील शौैचालयासह एकूणच स्वच्छतेचा आढावा घेण्यात आला. नगर पालिका स्वच्छतेच्या कामांत किती अग्रेसर आहे. कचरा निर्मूलन तसेच दैैनंदिन स्वच्छता कशी होते याबाबत विशेष पथक तसेच पालिकेने पाठविलेल्या माहितीच्या आधारावर केंद्राने शहर स्वच्छतेचा निकष ठरविला आहे. केंद्रीय पथकाने जानेवारीत संपूर्ण शहरात फिरून स्वच्छतेची पाहणी केली होती. याचे छायाचित्रणही केले होते. सोबतच नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना थेट उकिरडे अथवा हगणदारी ठिकाणचे छायाचित्र आॅनलाईन पाठविण्यास सांगितले होते. विविध पातळ्यांवर अभ्यास करून शहराला ३६८ वा क्रमांक दिला. जालना शहरात दररोज ओला व सुका मिळून सुमारे ८० टन कचरा जमा होतो. पालिकेकडे मनुष्य बळ कमी असल्याने सुमारे ६० ते ६५ टन कचरा दररोज उचलला जातो. पालिकेच्या स्वच्छता विभागात ३५७ कर्मचारी आहेत. संपूर्ण शहर योग्यरित्या स्वच्छ करण्यासाठी सातशे कर्मचाऱ्यांची गरज आहे. मात्र कर्मचारी संख्या कमी असल्याने शहर स्वच्छतेवर परिणाम होत असल्याचे सांगण्यात येते. मुख्याधिकारी संतोष खांडेकर म्हणाले, केंद्राच्या नगर विभाग विभागाने ही स्पर्धा घेतली होती. या स्पर्धेत जालना शहरास नेमके गुण किती मिळाले याची माहिती नाही. मात्र, ३६८ वा क्रमांक मिळाला आहे. यामुळे जालना शहरातील स्वच्छतेबाबत सुधारणा करण्याची गरज आहे. आगामी काळात विशेष स्वच्छता मोहीम राबवून शहर स्वच्छ व सुंदर करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. केंद्राने जे निकष सांगितले होते त्यानुसार अनेक निकष पालिकेने पूर्ण केले असल्याचे खांडेकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)