शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

स्वच्छ भारत अभियानचा वडवणीत बोजवारा

By admin | Published: November 13, 2014 12:22 AM

राम लंगे , वडवणी केंद्र व राज्य शासनाकडून निर्मल भारत अभियानाची सुरुवात करण्यात आली. मात्र वडवणी तालुक्यात या अभियानाचा पुरता बोजवारा उडाला आहे.

राम लंगे , वडवणीकेंद्र व राज्य शासनाकडून निर्मल भारत अभियानाची सुरुवात करण्यात आली. मात्र वडवणी तालुक्यात या अभियानाचा पुरता बोजवारा उडाला आहे. १७ हजारापैकी केवळ ५ हजार कुटुंबांकडेच शौचालय असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे ग्रा.पं. सदस्यांकडेही शौचालय नसल्याचे वास्तव समोर आले आहे.केंद्र व राज्य शासन राबवित असलेल्या निर्मल भारत अभियानाचे २ आॅक्टोबर १४ पासून स्वच्छ भारत अभियान असे नामकरण करण्यात आले. फक्त स्वच्छ भारत अभियान कार्यक्रमातून वैयक्तिक शौचालय बांधकाम करण्यासाठी १२ हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय ७ नोव्हेंबरला निर्गमित करण्यात आला. असे परिपत्रकही शासनाकडून हाती आले आहे.वडवणी तालुक्यात एकूण १६ हजार ९७० कुटुंब संख्या आहे. त्यापैकी ५ हजार ६२९ कुटुंबच फक्त शौचालयाचा वापर करीत आहेत. आजही ११ हजार ३४१ कुटुंबांकडे शौचालय नाहीत. त्यातच तालुक्यात ग्रामपंचायतची संख्या ३६ असून, या ग्रामपंचायतमध्ये सदस्यांची संख्या ३०२ आहे. विशेष म्हणजे ग्रा.पं. सदस्यांकडेही शौचालय नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. ३०२ सदस्यांपैकी ६२ सदस्यांकडे शौचालयच नाहीत. शौचालय बांधण्यात ग्रामपंचायतचीही उदासिनता असल्याचे यावरुन साफ दिसून येते.यापूर्वी वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी १० हजार रुपये अनुदान निर्मल भारत अभियान व महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून देण्यात येत होते. स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमाच्या धोरणाची अंमलबजावणी करण्यात येणार असून, वैयक्तिक शौचालय बांधकाम करण्यासाठी १२ हजार रुपये अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक शौचालय बांधण्याकडे वळले आहेत. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील नागरिकांनाही या प्रोत्साहनपर अनुदानाचा फायदा होत आहे.याबाबत पंचायत समितीचे विस्तार अधिकारी डी.बी. राऊत म्हणाले, शासनाच्या धोरणात्मक निर्णयानुसार व्यक्तिगत शौचालयासाठी १२ हजाराचे अनुदान देण्यात येणार असून, त्याची पूर्तता लवकरच करण्यात येणार आहे. तर गटविकास अधिकारी सी.एम.ढोकणे म्हणाले, ज्या ग्रा.पं. सदस्याकडे तसेच नागरिकांकडे शौचालय नाहीत अशा लोकांना शौचालय बांधण्यासाठी पुढे आणले जाईल. त्यांना भेटून मार्गदर्शन करण्यात येईल.