शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मनसेमुळे आघाडीला ८ जागी बसला फटका; शिंदेसेनेमुळे मनसेचे ३ प्रमुख उमेदवार पराभूत
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मुंबईत भाजपच नंबर वन, ३६ पैकी १६ जागांवर दणदणीत विजय; उद्धवसेनेपुढे मोठं आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: विधानसभेत महिलांचा आवाज बुलंद केव्हा होणार?; महामुंबईत फक्त ८ महिला आमदार
5
मंत्रिपदांसाठी अनेक नावांची चर्चा; महामुंबई परिसरातून इच्छुकांमध्ये जबरदस्त रस्सीखेच
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उद्धवनी मुंबई राखली, मात्र काँग्रेसचा पीळ सुटत नाही; नेत्यांची खदखद बाहेर पडली
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: पालघरमधील ‘ठाकूर’शाही संपुष्टात आली?; कथित पैसे वाटपाच्या गोंधळाने नुकसानच झालं
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अल्पसंख्याक बहुल मतदारसंघात काय घडले?; १३ पैकी ६ आमदार निवडून आले
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ठाणे जिल्ह्यात भाजपा शिवसेनेवर भारी; महापालिकेच्या अतिरिक्त जागा भाजप मागेल का?
10
तुमच्या वाहनासाठी आवडीचा क्रमांक घरबसल्या मिळवा; आरटीओची आजपासून ऑनलाइन सुविधा
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
15
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
16
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
17
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
18
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
19
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
20
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

२४ तासांच्या आत क्रीडा संकुल स्वच्छ करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2018 12:49 AM

विभागीय क्रीडा संकुलावर असलेले घाणीचे साम्राज्य, दारूच्या बाटल्या पाहिल्यानंतर संतप्त झालेल्या विभागीय आयुक्त आणि क्रीडा संकुल समितीचे अध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी क्रीडा उपसंचालक राजकुमार माहादावाड यांना २४ तासांच्या आत क्रीडा संकुल स्वच्छ करा, असा आदेश दिला. त्याचप्रमाणे खेळाडूंना मूलभूत सुविधा मिळाव्यात व विभागीय क्रीडा संकुलाचे स्वरूप बदलण्यासाठी १५ आॅगस्टपर्यंत मुदत दिली असल्याचे भापकर यांनी पत्रकारांशी बोलताना आज सांगितले.

ठळक मुद्देविभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांचे आदेश : मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी १५ आॅगस्टपर्यंत मुदत

औरंगाबाद : विभागीय क्रीडा संकुलावर असलेले घाणीचे साम्राज्य, दारूच्या बाटल्या पाहिल्यानंतर संतप्त झालेल्या विभागीय आयुक्त आणि क्रीडा संकुल समितीचे अध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी क्रीडा उपसंचालक राजकुमार माहादावाड यांना २४ तासांच्या आत क्रीडा संकुल स्वच्छ करा, असा आदेश दिला. त्याचप्रमाणे खेळाडूंना मूलभूत सुविधा मिळाव्यात व विभागीय क्रीडा संकुलाचे स्वरूप बदलण्यासाठी १५ आॅगस्टपर्यंत मुदत दिली असल्याचे भापकर यांनी पत्रकारांशी बोलताना आज सांगितले.विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी आज विभागीय क्रीडा संकुलाला भेट दिली आणि पाहणी केली. खेळाडू, नागरिकांना विभागीय क्रीडा संकुलावर अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे आणि आपल्या स्तरावर विभागीय क्रीडा संकुलासाठी वेळ देता न आल्याचेही भापकर यांनी मान्य केले. ते म्हणाले, ‘विभागीय क्रीडा संकुलात अडचणी आहेत, २४ तासांच्या आत विभागीय क्रीडा संकुलातील कोपरान्कोपरा स्वच्छ करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. क्रीडा संकुलावर सातत्याने लक्ष ठेवण्यासाठी ७ समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या समित्या क्रीडा संकुलाचा आढावा घेऊन अहवाल तयार करतील. त्याचप्रमाणे २ ते ३ महिन्यांत विभागीय क्रीडा संकुल समितीची बैठक घेण्यात येणार आहे.’पाहणीदरम्यान त्यांना विभागीय क्रीडा संकुलात कचरा आणि दारूच्या बाटल्याही आढळल्या. विभागीय क्रीडा संकुलाची भिंतीची कम्पाऊंड वॉल ही ८४0 मीटर आहे. या भिंतीवरून बाजूच्या वसाहतीतून कचरा टाकला जात आहे. याविषयी त्यांनी विभागीय क्रीडा संकुलाची भिंत ही साडेचार फूट आणखी वाढविणार असून, त्यात काटेरी कुंपण लावले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. सांडपाण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंगचे काम हाती घेण्यात येणार आहे. तसेच पावसाळ्यात इनडोअरहॉलमध्ये पाणी बॅडमिंटन कोर्टवर पडते. त्याविषयीचे इस्टिमेट मागविण्यात आले आहे. क्रीडा संकुलावर ओपन जीम व रोलर खरेदीसाठी डीपीडीसीमध्ये प्रस्ताव सादर करून त्या कामाला लवकरात लवकर सुरुवात करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. बैठकीस निमंत्रित सदस्य त्र्यंबक तुपे, उदय डोंगरे, अशासकीय सदस्य प्रा. फुलचंद सलामपुरे, दिनकर तेलंग उपायुक्त वर्षा ठाकूर, उपजिल्हाधिकारी रिता मेत्रेवार, क्रीडा उपसंचालक राजकुमार माहादवाड, जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक गिरी, चंद्रशेखर घुगे, तहसीलदार विजय राऊत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अरविंद शेजूळ, औरंगाबाद जिल्हा आॅलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष पंकज भारसाखळे, सचिव गोविंद शर्मा उपस्थित होते.सूतगिरणीच्या जागेवर स्विमिंगपूलस्विमिंगपूल, अ‍ॅस्ट्रो टर्फ आणि सिंथेटिक ट्रॅकविषयी छेडले असता सूतगिरणीच्या चार एकर जागेवर स्विमिंगपूल व अ‍ॅस्ट्रो टर्फची योजना आहे आणि याविषयीचा प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे. त्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे विभागीय आयुक्त भापकर यांनी सांगितले.कामगारांची २ कोटी ५४ लाख थकबाकीयादरम्यान सूतगिरणीतील कामगारांचे ४ कोटी ५४ लाख रुपये देणे अद्यापही बाकी आहे. याआधीचे ४ कोटी ८४ लाख रुपये कामगारांना मिळाले आहेत. याविषयीचे निवेदन विठ्ठल कदम यांनी विभागीय आयुक्तांना दिले.