लोकमत न्यूज नेटवर्ककचनेर : कृषी विभागामार्फत खोडेगाव व बेंबळ्याची वाडी येथे ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेअंतर्गत २०१६-१७ व २०१७-१८ या वर्षात १०० शेततळे पूर्ण झाले असून ४५ शेतकऱ्यांना राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत अस्तरीकरणाचा लाभ देण्यात आला. प्रथमच शेततळ्यांची शतकपूर्ती झाल्याने या भागातील शेतकºयांना मोठा दिलासा मिळाला असून या तळ्यांमुळे परिसर पाणीदार झाला असून या भागातील २०० हेक्टर क्षेत्र बागायत झाले आहे.खोडेगाव व बेंबळ्याची वाडी गावाचे भौगोलिक क्षेत्र १८४१ हेक्टर असून वहितीखालील क्षेत्र १४२७ हेक्टर आहे. सदरील गावातील विहिरीची पाण्याची पातळी २०१६ -१७ या वर्षात खालावलेली होती. बरेच शेतीक्षेत्र कोरडवाहू होते. परंतु कृषी सहायक संजय पवार हे रुजू होताच त्यांनी या गावांचे रुपडेच पालटून टाकले.सदरील शेततळे पूर्ण करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी अशोक कोंडे, मंडळ कृषी अधिकारी रोहिदास राठोड, कृषी पर्यवेक्षक हरिभाऊ कातोरे यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. जि.प. सदस्य प्रकाश चांगुलपाय, पंचायत समिती सदस्या शर्मिला कल्याण गायकवाड, सरपंच अर्जुन ढगे, उपसरपंच पूनम नागलोत, ग्रा.पं. सदस्य यांनी मोलाचे योगदान दिले. तसेच कल्याण गायकवाड व प्रगतीशील शेतकरी अनिल चौधरी, माजी सरपंच बालाजी हुलसार यांनी सहकार्य केल्याने शेततळ्यांची ही शतकपूर्ती होऊ शकली.टँकरमुक्तीसाठीही हातभारकृषी सहायक संजय पवार यांनी गावातील शेतकºयांना मार्गदर्शन करून ‘मागेल त्याला शेततळे’योजनेचे महत्त्व पटवून दिले. यानंतर शेततळ्यांच्या कामांचा धडाका सुरु झाला.च्पाहता पाहता १०० शेततळे पूर्ण झाले आणि सदरील गावातील २०० हेक्टर क्षेत्र बागायती होऊन टँकरमुक्त होण्यास मदत झाली. तसेच भाजीपाला व फळबागेखालील क्षेत्रातही वाढ होऊन शेतकºयांचा आर्थिक स्तर उंचावला. शिवाय गाव दुष्काळमुक्त होण्यास मदत झाली.मी माझी जुनी डाळींबाची बाग पाण्याअभावी तोडून टाकणार होतो, परंतु आमच्या सजेतील कृषी सहायक संजय पवार यांच्या मार्गदर्शनामुळे मला शेततळे व अस्तरीकरणाचा लाभ मिळाला. यामुळे माझी फळबाग जगली तसेच नवीन भाजीपाला लागवड करून उदरनिर्वाहाचे साधन मिळाले.-बाळासाहेब डिघुळे, शेतकरी, खोडेगाव
शेततळ्यांच्या शतकपूर्तीने खोडेगाव परिसर पाणीदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 12:56 AM