नदीकाठच्या बाजूला वृक्षारोपण आणि रिव्हरफ्रंटचा विकास करण्यात येणार आहे.
३१२ प्रवाशांची कोरोना तपासणी
औरंगाबाद : महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे शुक्रवारी रेल्वेस्टेशन आणि विमानतळावर ३१२ प्रवाशांची तपासणी करण्यात आली. जाधववाडी भाजी मंडई, छावणी येथील आठवडी बाजारात ४० नागरिकांची तपासणी केली. शुक्रवारी दिवसभरात महापालिकेकडून ९४३ नागरिकांची कोरडा तपासणी करण्यात आली.
दिव्यांग बांधवांना मार्च महिन्यात मानधन
औरंगाबाद : मानधन मिळावे म्हणून शहरातील अपंग बांधव अधून-मधून मनपा मुख्यालयासमोर आंदोलन करीत आहेत. शासनाने ठरवून दिलेल्या अठराकलमी कार्यक्रमासोबत मार्च महिन्यात मानधन देण्यात येणार असल्याची माहिती महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी दिली.
कचरा प्रक्रियेचे थेट प्रक्षेपण
औरंगाबाद : पडेगाव आणि चिकलठाणा येथे दररोज तीनशे मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येत आहे. प्रक्रिया केंद्रात दररोज काम कशा पद्धतीने सुरू आहे, याची माहिती घेण्यासाठी सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. या सीसीटीव्हीचे कमांड सेंटर महापालिका प्रशासन यांनी आपल्या दालनात बसविले आहे. शहरातील स्मार्ट सिटीच्या डिस्प्ले बोर्डवर हे प्रक्षेपण दाखविण्यात येणार आहे.