वाळूज महानगर : आषाढी यात्रेनंतर शनिवारी पंढरपूर व वळदगाव ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी स्वच्छता अभियान राबविले. या मोहिमेंतर्गत जमा झालेला कचरा घंटागाडी व ट्रॅक्टर्सद्वारे उचलून परिसर स्वच्छ केला.
छोट्या पंढरपुरात शुक्रवारी आषाढी यात्रेनिमित्त लाखो विठ्ठल भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. वारकरी व भाविकांसाठी विविध राजकीय पक्ष, सामाजिक संस्था आदींच्या वतीने फराळ, चहा-पाणी आदींची व्यवस्था करण्यात आली होती.
फराळाचे साहित्य वाटप करण्यासाठी द्रोण, पत्र्यावळ्या तसेच चहाचे कप, पाण्याचे ग्लास भाविकांनी रस्त्यावरच फेकून दिल्यामुळे मुख्य रस्त्यावर तसेच ठिक-ठिकाणी कचरा साचला होता.
शनिवारी पंढरपूरचे सरपंच शेख अख्तर, उपसरपंच महेंद्र खोतकर, ग्रामपंचायत सदस्य अनिल कोतकर,महेबूब चौधरी, शेख गुलाब, मिरा गिºहे,अंजिराबेगम शेख, फिरोजाबी शहा, लताबाई कानडे, बाळासाहेब राऊत, निता पवार, अप्पासाहेब साळे,शेख गुलाब, संगिता गायकवाड,पुजा उबाळे, तस्लीम शेख,सुमन खोतकर, राजेंद्र खोतकर आदींनी पंढरपूर ग्रामपंचायत कार्यालय ते तिरंगा चौक या रस्त्याच्या दोन्ही बाजुने साफ-सफाई केली. या स्वच्छता मोहिमेत जमा झालेला केर-कचरा घंटागाडी व ट्रॅक्टरद्वारे उचलुन नेण्यात आला.
यावेळी ग्रामपंचायतीच्या ८ स्वच्छता कर्मचाऱ्यांनी सहभाग घेऊन परिसराची स्वच्छता केली. याच प्रमाणे वळदगाव ग्रामपंचायतीचे सरपंच कांतराव नवले, उपसरपंच गुंफाबाई खोतकर, माजी सरपंच राजेंद्र घोडके, नारायण राजपूत, विष्णू झळके, समिंद्राबाई साबळे, नूरजहा शेख, जया राऊत, उत्तम खोतकर, ग्रामविकास अधिकारी श्रीकांत पालवे आदींनी वळदगावपासून पंढरपूरपर्यंत मुख्य रस्त्याची स्वच्छता केली.
यानंतर मंदिर परिसरातील प्रांगणाची पदाधिकाºयांनी स्वच्छता कर्मचाºयांच्या मदतीने स्वच्छता केली. या दोन्ही ग्रामपंचायतीने यात्रा संपताच स्वच्छता अभियान अभियान राबविल्यामुळे नागरिक व व्यवसायिकांनी समाधान व्यक्त केले आहे.