लोकमत न्यूज नेटवर्कलातूर : शहरातील कन्हैयानगर भागातील दयानंद भिवाजी बिराजदार (३६) हे बाहेरगावी गेले असता त्यांचे बंद घर अज्ञात चोरट्यांनी फोडून १८ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल लंपास केला़ याबाबत विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ चोरट्यांनी घरात प्रवेश करून कपाटातील सोन्याचे दागिने व रोख १० हजार रूपये, असा एकूण १८ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे़
बंद घर फोडले; १९ हजारांचा मुद्देमाल लंपास
By admin | Published: May 27, 2017 11:07 PM